टेंभुर्णी । प्रतिनिधी – टेंभुर्णी येथील प्रसिद्ध डॉक्टर अविनाश सूरूषे यांच्या मुलांने श्री वसंतराव पवार मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल संशोधन केंद्र आडगाव नाशिक येथे शिक्षण घेत आपले डॉक्टर होण्याचे धेय गाठत आपल्या परीवारचे स्वप्न पूर्ण केले. डॉक्टर अभिषेक याने एम बी बी एस ची पदविका प्राप्त केल्या बद्दल येथील डॉक्टर मंडळी यांनी त्यांचे घरी जाऊन त्यांचा स हृदय सत्कार केला.सोबत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.या वेळी सर्व श्री डॉक्टर श्री दीपक नागरे,श्री एस बी जायभाये ,पंडित सूरुषे,मनीष सोमाणी, सर्जेराव कुमकर,पवन वराडे, राजू करवंदे, गोपाल बांगड,रमेश मोठे,धीरज काबरा, यांच्या सह त्यांचे वडील डॉक्टर अविनाश सुरुसे, प्रदीप काबरा यांची शुभेच्छा देता वेळी उपस्थित होते. अभिषेक ने आपल्या यशा चे श्रेय आपल्या आई सौ अंजली सुरूशे, वडील अविनाश सुरूशे व आपल्या गुरुजन यांना दिले.