कोनड बु. येथे हनुमान जयंती व जोगेश्वरी माता भव्य यात्रा महोत्सव

30

जाफराबाद । प्रतिनिधी – दोनशे वर्षांपूर्वी पासून चालत आलेली नोहमीची परंपरा आजही तितक्याच जोमाने गावकर्‍यांनी टिकवून ठेवली आहे. दि.02 एप्रिल ते 07/04/2023 पर्यंत उत्सव सोहळा असून कुस्तीच्या आखाड्याने कार्यक्रमाची सांगता होते, पंचक्रोशीत नावलौकिक आहे मराठवाडा विदर्भ सरहद्दवर जालना जिल्ह्यातील कोनड बु.हे गाव निजामशाही काळापासून कला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये अग्रेसर असून पूर्वी यात्रेच्या उत्सवामध्ये नाटककार मंडळी होऊन गेली त्यांचे रात्र रात्र नाटके चालायची पंचक्रोशीतील आजूबाजूच्या गावकर्‍यांनी या गावच्या उत्साहाची अगदी चातकासारखी वाट बघावी त्याचप्रमाणे कोनड येथील कुस्ती आखाडा पूर्वीपासून वैशिष्ट्यपूर्ण चालत आलेला आहे मात्र गावातील पैलवान मंडळींनी आखाड्यातील बक्षीस बाहेरगावी कधीही जाऊ दिले नाही कारण गावामध्ये एक काळ चांगल्या प्रकारे घर परत एक तरी मुलगा केवळ आखाड्यासाठी असायचाच आज फक्त आठवणी राहिल्या त्याचप्रमाणे संगीत भजन मंडळी यांनीही पंचक्रोशीत आपल्या नावाचा ठसा उमटविला होता
चारशे वर्षांपूर्वी गावच्या पूर्वेस असलेल्या डोंगरावर गवळी लोकांनी जोगेश्वरी मातेची स्थापना केली अशी आख्यायिका आहे तेथे नेहमी वाघांचा मंदिर परिसरात वावर असायचा कारण मंदिर परिसराला लागून 55 हेक्टर सरकारी जमिनीवर घनदाट जंगल होते आज ते संपूर्ण उजाड झालेले दिसते पूर्वी देवीचे मंदिर हेंबाडपंथी दगडातील बांधकामातून गावकर्‍यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून त्या ठिकाणी मंदिराचे भवताली फार मोठा दगडी पर कोट बांधून कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करून वृक्षारोपण केलेले आहे वर्षातून नवरात्र व चैत्र पौर्णिमा उत्सव सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन हे उत्सव पार पडतात काळाच्या ओघात अनेक पारंपारिक उत्सव बंद पडलेले दिसतात मात्र कोनड येथील पूर्वजापासून चालत आलेली परंपरा तितक्यात जोमाने आजही सुरू आहे पाच दिवसापासून या उत्सवाची सुरुवात होते प्रत्येक दिवसाला वेगवेगळे अवतारांचे स्वरूप दाखवण्यात येते त्याचप्रमाणे मनोरंजनही करण्यात येते यानिमित्ताने स्थलांतरित झालेले त्याचप्रमाणे नोकरी तसेच कामानिमित्त बाहेर असलेले लोक व गावातील लेकी बाळी आवर्जून या देवीचे उत्सवाला न चुकता हजर राहतात चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हनुमान जन्मोत्सव विधीवत अभिषेक करून व हनुमंतरायाचा सकाळीच आठ वाजेच्या दरम्यान महाप्रसादाचा कार्यक्रम होतो त्याचप्रमाणे दिवसभर जोगेश्वरी गडावर यात्रेची वर्दळ सुरू होते गावकर्‍यांचे वतीने जोगेश्वरी गडावर यात्रेकरू साठी महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला असून प्रकाश खंडेलवाल वरुड बु. रुची हार्डवेअर मालक काही वर्षापासून महाप्रसादाचा संपूर्ण खर्च माता जोगेश्वरी चरणावर कुठलाही बोलबाला न करता अर्पण करतात संपूर्ण यात्रेकरू व गावकरी मोठ्या भक्ती भावाने प्रसाद घेतल्याशिवाय कोणी राहत नाही पौर्णिमेच्या रात्री रात्रभर दशावतार सोंगे त्याचप्रमाणे सकाळच्या चार वाजता महादेव पार्वती नंदीचे सोंग आकर्षण ठरते त्यानंतर राम आणि रावण यांची आख्यायिका शेवटी रावणाचा वध होऊन नवमीचा शेवट होतो सकाळी सहा वाजता देवीच्या स्वारीला सुरुवात होते हे काही ठराविक सोंगे परंपरेनुसार चालत आले असून नंदीच्या महादेव पार्वती सोंगाचा मान लोहाराच्या घरात तर देवीचे स्वारीचा व हनुमंताचे स्वारीचा मान काही दिवसापासून राजपुताकडे वंशपरंपरेनुसार चालत आला असून माजी सैनिक एकनाथ परिहार यांच्याकडे देवीच्या स्वारीचे सोंग आहे खर्‍या अर्थाने देवीची स्वारी निघाल्यानंतर सर्वच महिला पुरुष आभार वृद्ध या दर्शनासाठी अतुर होऊन मोठ्या भावभक्तीने दर्शन घेतात सुहासिनी सडा रांगोळी काढून स्नान संध्या करून भावभक्तीने ओटी भरतात देवीची स्वारी पूर्ववेशीपासून तर पश्चिम मारुती मंदिरासमोर येऊन शेवटी गावच्या मानाच्या चौकामध्ये सिंहासनावर स्वारीला बसवून मोठ्या भक्ती मय वातावरणात आरती होते व आंबा भवानी की जय या गजरात देवीची स्वारी पूर्ववेशीला जाऊन विसर्जित होते या वेळेला सर्वच देवीच्या स्वारीचा समारोप करून पुढील कार्याला लागतात परंपरेनुसार गावातून सकाळी आठ वाजता वेड्या नवरदेवाचे सोंग काढण्यात येते या मनोरंजनातून लोकांची करमणूक होते चैत्र महोत्सवाचे शेवटी अकरा वाजता कुस्त्यांची दंगल सुरू होते पंचक्रोशीतील कुस्ती शौकीन याही कार्यक्रमाला फार मोठी गर्दी करतात आतापर्यंत या आखाड्याचे नावावर महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान वेगवेगळ्या स्टेट मधील पहिलवानांनी कोनड गावच्या आखाड्यामध्ये येऊन गावला मान दिला आहे आजही तागायत आखाडा चालू आहे गावात कुणीही कुस्ती करणार नसला तरी पूर्वजांची परंपरा कायम ठेवून गावातील सर्व स्तरातील लोक आखाड्यासाठी सढळ हाताने फार मोठी मदत करतात आणि कुस्तीच्या आखाड्याबरोबरच आमच्या चैत्रोत्सवाच्या कार्यक्रमाची सांगता होते विशेष एवढा मोठा सोहळा परंतु आतापर्यंत सुव्यवस्थेतून कुठल्याही प्रकारे गावाला गालबोट लागेल अजून तरी जोगेश्वरी मातेच्या कृपाप्रसादाने असे काही घडले नाही दरवर्षी उत्सव येतो काही अपवाद वगळता आनंदाने पार पडतो याला जोगेश्वरी मातेचा वरदहस्तच म्हणावे लागेल,