वाघु्रुळ येथे जगदंबा देवी यात्रा महोत्सव

25

जालना । प्रतिनिधी – वाघ्रुळ हे गाव मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर वसलेले डोंगराच्या कुशीत वसले आहे. जगदंबा देवीच्या वास्तव्यामुळे हे गाव सर्वदूर परिचित आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारात जाईपर्यंत हे मंदिर दिसत नाही. तसेच या ठिकाणी जाण्यासाठी गावाला आणि डोंगराला वेढा घालून जावे लागते. अशा वातावरणातून मंदिरात गेल्यानंतर मंदिराची सुंदरता आणि दिव्यता पाहून मन प्रसन्न होतं; आणि थकवा निघून जातो तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहुरगडची रेणुका माता या दोघी एकाच ठिकाणी असलेलं जगदंबेचं हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे. एकाच गाभार्‍यात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी या देवींच्या मूर्ती उभ्या आहेत. सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे हे मंदिर आता मात्र पूर्ण कात टाकून नवतेज घेऊन उभे आहे. मात्र, दीपमाला च्या माध्यमातून आजही हे हेमाडपंथी असल्याचे कळते.
वाघ्ररूळ (ता जालना ) जगदंबा देवि चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सव आयोजन केले आहे या निमित्त दिनांक 06 एप्रिल गुरुवारी सकाळी श्री हनुमान जन्मोत्सव व जगदंबा देविची महापूजा दुपारी 5 ते 7 नवसाच्या बारा गाडयांचा कार्यक्रम आणि सायंकाळी 5 ते 6 वाजे पर्यंत झेंडा मिरवणूक आणि सायंकाळी 7 वाजता जगदंबा देविची महाआरती होईल रात्री 9 ते 12 वाजे पर्यंत तुफान विनोदी नाटक कुंक माखलं रक्ताने हे नाटक सादर होणार आहे आणि दिनांक 7 एप्रिल शुक्रवारी रोजी सकाळी देवीचे भव्य सोंग आणि दुपारी भव्य कुस्त्यांची आयोजन केले आहे तरी भाविकांनी यात्रा उत्सव साठी यावे असे आव्हान संस्थान समस्त ग्रामस्थ च्या वतीने करण्यात आहे आहे