दाभाडी । प्रतिनिधी – दाभाडी (ता. बदनापूर) येथील शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक अर्जुनराव महाजन हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी
महाजन यांच्या रूपाने एक प्रामाणिक व जबाबदार शिक्षक आमच्या शाळेतून जात आहे,याची मोठी खंत वाटत आहे अशा भावना शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकराव निकम यांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय स्टेट बँकेचे माजी प्रबंधक अंबादासराव रगडे, पंचायत समितीचे माजी सभापती अदनान सौदागर, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव बसंतीलाल गोलेच्छा, उपाध्यक्ष दिलीपराव वायकोस, सहसचिव पांडुरंग जैवाळ, संचालक अरुण महाजन, गणेशराव भेरे, आसाराम जैवाळ, संतोषराव देशपांडे, मेहराजभाई सिद्दिकी, बालू टेकाळे, सेवानिवृत्त प्राचार्य अशोकराव खरात, सेवानिवृत्त प्राचार्य बी. डी. झोटे, सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य अनिल मोरे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शिवाजीराव बकाल, उपसरपंच कैलास बकाल, माजी सरपंच सुभाष गोलेच्छा, राजेंद्र देहाडराय, प्रल्हादराव निकम,भास्करराव निकम ,बबनराव निकम, संजय गाडेकर, पत्रकार कृष्णा निकम, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी उपाध्यक्ष धोंडीराम बकाल, शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका एस. ए. चौधरी, एस. व्ही. पाडळकर, शाळेचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक बी. जी. डोळस, सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक व्ही. आर. इंगळे, आर. टी. देशमुख, वाय. टी. गाठेकर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन जैवाळ, सचिव चंदन गोलेच्छा, मुनीर बागवान, बालू वायकोस, प्रदीप जैवाळ, देवेंद्र देशमुख, राहुल जोशी, सागर जैवाळ, धोंडीराम पठाडे, पंढरीनाथ टेकाळे, ग्रा. पं. सदस्य जुल्ेकार बागवान, कैलासराव जुंबड आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली त्यानंतर मान्यवरांच्या स्वागतासाठी स्वागत गीत झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण निकम यांनी केले. यामध्ये त्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचा शब्दसुमनाने स्वागत करीत परिचय करून दिला त्याचप्रमाणे सत्कारमूर्ती ए. एन.महाजन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
त्यानंतर सत्कार मूर्ती ए. एन.महाजन व त्यांच्या पत्नी सौ. कल्पना महाजन यांचा संस्थेच्यावतीने तसेच शाळेच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थ्यांनीही श्री. महाजन व सौ. महाजन यांचा सत्कार केला. यावेळी श्री. महाजन यांचे जावई अभिजीत पालवे, मुलगी सौ. पूनम महाजन, द्वितीय कन्या अश्विनी महाजन, चिरंजीव कुणाल महाजन यांचाही शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून महाजन सर यांच्याविषयी आपल्या आठवणी व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे शाळेचे सेवानिवृत्त प्राचार्य ए.के. खरात व शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. एस. जी. मिश्रा , प्रमोद वायकोस यांनीही आपल्या भाषणातून महाजन सरांविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्राध्यापक ए. जे.एडके यांनी केले तर आभार प्रदर्शन भावी पर्यवेक्षक बी. आर. गायकवाड यांनी केले. आर. व्ही. कंचलवाड यांनी हा कार्यक्रम संगीतमय केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के. डी. वाडेकर, आर. एन. जायभाये, एस. ए. घोडके, श्रीमती के. आर. व्यवहारे, श्रीमती डी. एन. निकम, युवराज जाधव,भारत साळवे आदींनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सर्व व्यवस्थापन पी. आर. बोराडे, एस. टी. कुटे, एन. एन.सोनटक्के, केशवराव रगडे, रमेशराव, वायकोस,पंकज निकम,कृष्णा निकम ,महेंद्र लोखंडे आदींनी उत्तमप्रकारे केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक, विद्यार्थी व प्रतिष्ठित ग्रामस्थांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनो खुप अभ्यास करा, मोठे व्हा- ए. एन. महाजन
सेवानिवृत्ती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आपल्या सत्काराला उत्तर देतांना सत्कारमूर्ती ए. एन. महाजन सर अत्यंत भावुक झाले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र दिला तसेच खूप अभ्यास करून मोठे व्हा असा संदेशही दिला. मी शरीराने जरी इथं नसलो तरी मनाने मी इथेच राहील आणि शाळेशी सतत संपर्क ठेवेन अशी ग्वाहीही त्यांनी शेवटी दिली.