जालना । प्रतिनिधी – येथील जुना जालना भागातील आनंदवाडी स्थित श्रीराम मंदिर परिसरात असलेल्या राम मंदिरात हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या गुरुवार दि. 6 एप्रिल 2023 रोजी म्हणजेच चैत्र शु. पौर्णिमेला श्री हनुमान जयंती निमित्त सकाळी 5 ते 6.18 अभिषेक तसेच स.भ. रामदास आचार्य यांचे गुलालाचे प्रवचन होईल. जन्मोत्सवानंतर लगेचच आरती आणि सकाळी 7 ते 8 महाप्रसाद होईल. या कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.