टेंभुर्णी जवळील गोंधनखेडा पाटी जवळ भीषण अपघात, पोलीस शिपाई नितीन मतकर जागीच ठार, पोलीस शिपाई राहुल जंगले गंभीर जखमी

30

टेंभुर्णी । प्रतिनिधी – येथून जवळच असलेल्या गोंधळखेडा पाटी जवळ मद्यधुंद अवस्थेतील मोटरसायकल चालकांनी समोरून येणार्‍या पोलीस शिपायांच्या मोटर सायकलला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल वरील पोलीस शिपाई नितीन मतकर हे जागीच ठार झाले. व शिपाई राहुल जंगले गंभीर जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे की टेंभुर्णी येथून जवळच असलेला गोंधळ खेडा पाटी जवळ जात असलेले भोजपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई, नितीन उत्तमराव मतकर वय 28 व कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई राहुल रामू जंगले वय 25, यांना मोटरसायकल एम एच 21 ए एफ 3977 या मोटर सायकलवरील मद्यधुंद अवस्थेतील टेंभुर्णी कडून जाफराबाद कडे जात असणार्‍या मोटारसायकल वरील पोलीस मित्रांना समोरून विरुद्ध दिशेने जोरात धडक दिली. या धडकेत नीतीन मतकर जागीच ठार झाले तर राहुल जंगले हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जालना येथे हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षण बालाजी वैद्य, पोलीस उपनिरीक्षक सतीश दिंडे, पंडित गवळी, सचिन तिडके यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.