उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाचा निषेध; भान ठेवून बोला अन्यथा फिरणं मुश्किल करू – आमदार लोणीकर

80

जालना । प्रतिनिधी – कोरोना सारख्या भीषण संकट काळात राज्यातील जनता मरत असताना.. भीषण अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या जमिनी, शेतकर्‍यांची पीक, शेतकर्‍यांची ढोर गुर वाहून जात असताना उद्धव ठाकरे घरात बसून घरकोंबड्या प्रमाणे राज्य फेसबुक वर चालवत होते. स्वतःच्या आमदार खासदार मंत्र्यांनाही भेटी देत नव्हते. उद्धव ठाकरे च्या अशा वागण्यामुळे पक्ष गेला चिन्ह गेले आमदार खासदार ही गेले खाली बाकी काहीच राहील नाही. आता तरी राजकारणातील तज्ञ नेतृत्व, चानाक्ष नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व, लोकप्रिय नेतृत्व मा. देवेंद्र जी फडणवीस साहेबांवर टीका करताना तारतम्य बाळगा नसता आम्हाला ही जशास तसे उत्तर देता येईल. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आता परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे केले. पुढे बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी उद्धव ठाकरे यांचा खरपूस समाचार घेताना म्हणाले की देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमितजी शहा देवेंद्रजी फडणवीस जेपी नड्डा चंद्रशेखर बावनकुळे सुधीर भाऊ मुनगंटीवार आमच्या या नेत्यांवर टीका करताना भान ठेवून बोला नसता तुमचं महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य तुम्हाला या महाराष्ट्रात फिरू देणार नाही. तुम्ही पुन्हा वारंवार अशीच टीका करत राहिल्यास महाराष्ट्रातील जनता तुमचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही.