जाफराबाद | प्रतिनिधी – जाफराबाद महावितरण उपविभाग कार्यालयाला मार्च अखेर घरगुती व व्यावसायिक ग्राहकाकडून 1 कोटी 12 लक्ष रुपये वसुली करण्याचे उदिष्ट देण्यात आले होते. त्या अनुषंगाने महावितरण कार्यालयातील सर्वच कर्मचार्यांनी मार्च 2023 अखेर दिलेल्या उद्दिष्टाहून अधिक सुमारे 2 कोटी 2 लक्ष रुपये विक्रमी वसुली जमा केली आहे. जालना जिल्ह्यातून वसुली जमा करण्याच्या प्रमाणात जाफराबाद उपविभाग जिल्ह्यातून अग्रेसर आहे. महावितरणचे श्री. दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक अभियंता सुदर्शन लोढा, श्री. चिंचाने, श्री. गीते यांच्यासह सर्वच आधिकारी व कर्मचार्यांनी गावोगाव जावून प्रत्यक्ष ग्राहकांशी संपर्क साधून ही मोहीम यशस्वी केली. उपविभाग अंतर्गत येणार्या सर्वच गावात महावितरणच्या कर्मचार्यांनी सतत पाठपुरावा करून, ग्राहकांना समजावून सांगून हे उद्दिष्ट साध्य केले आहे. दिलेल्या उदिष्टापेक्षा जवळपास दुपटीने वसुली जमा करणारे जाफराबाद महावितरण उपविभाग पहिला ठरला आहे. महावितरणच्या सर्व कर्मचारी यांनी ऊन वारा पाऊस कशाची परवा न करता महावितरणने दिलेले उद्दिष्ट पार केले. विक्रमी वसुली झाल्यामुळे जाफराबाद वर्क फेडरेशन तर्फे श्री. सुदर्शन लोढा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित कर्मचारी अंकुशराव दूनगहू, सूर्यकांत खरात, विष्णू कड, विजय कड, विनोद सपकाळ, आदेश जोगदंड, हिवाळे साहेब, संतोष सपकाळ, रामदास फदाट, चुंगडा साहेब, दीपक वाघमारे, श्री. मतीन, श्री. देवडे, कैलास दुनगहू, रामू सोलाट, प्रसाद अक्कर, शेख खिजर, अण्णा बोर्डे, रवी साबळे, श्री. सपाटे, नितीन दूनगहु शेख रफिक, रामू कुमकर सुभाष कळंगे, मगरे, गजानन जाधव गायके साहेब, तुळशीदास इंगळे समाधान गाडे प्रकाश गाडे राहुल दाभाडे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.