परतूर । प्रतिनिधी – परतूर येथे दि.3,एप्रिल रोजी माहेश्वरी समाजाच्या नूतन कार्यकारिणी ची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडलीआहे. परतूर तालुकाध्यक्ष पदी राजेंद्र पोरवाल, यांची व शहर अध्यक्ष, गोविंद झंवर, यांची सर्व सहमतीने बिनविरोध निवड करण्यात आली.
तालुका कार्यकारिणीचे उपाध्यक्ष, नंदकिशोर मंत्री, सचिव, महेश लाहोटी, सहसचिव, रवी मुंदड़ा, संगठन मंत्री, अजीत पोरवाल कोषाध्यक्ष, सत्यनारायण राठी, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शहर कार्यकारिणी उपाध्यक्ष गणेश जेथलीया, सचिव, बालाजी चांडक ,सहसचिव, प्रशांत सोमानी, संगठन मंत्री, शिवप्रसाद मुंदडा, कोषाध्यक्ष, रवी सोमानी यांची निवड करण्यात आली.
यावेळी निवडनूक अधिकारी अखिल भारतीय माहेश्वरी सभेचे सदस्य ओमप्रकाश मंत्री यांची उपस्थिती होती. व संजय दाड, शिवजी मामा दरगड, लक्ष्मीनारायण मानधना, प्रसाद झंवर, राजेश मंत्री , राधेश्याम मुंदड़ा, जगदीश झंवर श्याम सोनी ,यांची प्रमुख उपस्थिति होती.