जालना । प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पक्षाच्यावतीने राज्यभर‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कार्याचे स्मरण करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी व शिवसेनाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे, माजी राज्यमंत्री मा.अर्जुनराव खोतकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हि गौरव यात्रा दि. 05/04/2023 बुधवार रोजी, सायंकाळी 5.00 वा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जालना येथून यात्रा प्रारंभ होणार असून, पुढे काद्राबाद चौक-सराफा रोड-फुलबाजार (महर्षी दयानंद चौक) व स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे यात्रेचा समारोप होईल.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठा त्याग केला. विरोधक राजकीय सूडबुद्धीने वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत असून जनतेची दिशाभूल करीत आहेत. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण व्हावे, त्यांचा त्याग, देशाप्रती असलेले समर्पण नव्याने लक्षात घेता यावे, यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार येत असून,
स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेमध्ये भाजपा व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून, या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेमध्ये सावरकर प्रेमींनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर (आबा) दानवे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.