टेंभुर्णी । प्रतिनिधी – जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथे दि 1 शनिवारी रोजी समाजात चार धाम करून आई वडिलांना उपाशी ठेवणार्या लोकांची संख्या कमी आहे.परंतु तुम्ही कितीही देव देव केले तर तुम्हाला देव भेटणार नाही.तुमचे खरे देव आई वडिलांच्या रूपातच तुमच्या घरातच आहे.म्हणून काळजी घ्यावी त्यांना जीव लावा तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही.असे निरूपण गणेश महाराज कोल्हे यांनी केले.
जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण श्री रामनुवमी व हनुमान जयंतीची निमित्त साधुन देळेगव्हाण येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कीर्तनाचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
श्री कोल्हे महाराज बोलताना म्हणाले की आजच्या तरूणांनि श्रावण बाळाप्रमाणे आई वडिलांची सेवा केली पाहिजे.कारण जे आई वडिलांची सेवा करतात त्यांना कशाचीही कमी पडत। नाही.तुम्ही जे विश्व पाहत आहे ते तुम्ही तुमच्या आई वडिलांची उपकार आहेत.
इतिहास जर चाळला शिवबाच्या काळातील मावळे शिवाजी महाराजांसाठी मृत्यूला अलिगंण देण्यासाठी तयार होते.शिवबाने देखील आपल्या आईच्या प्रेरणेने स्वराज्याची स्थापना करून एक आगळा वेगळा हतिहास रचला आहे.
परंतु आजच्या कलियुगातील तरुण आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवत आहे.ही शोकांतिका आहे. त्याच बरोबर श्री कोल्हे महाराज म्हणाले की,देह हा दुर्लभ आहे त्यामुळे प्रत्येकाने या मनुष्य देहात आल्यानंतर परमार्थ करणे करायला हवा, जीवनात एखादा तरी गाथा, ज्ञानेश्वरी ,वाचायला हवे, हे ग्रंथ वाचल्यानंतर मनुष्याच्या आयुष्यात आमूलाग्र बदल निश्चित असल्याचे त्यांनी ठोकपणे सांगितले.जो देवाचे भजन करतो त्यांचा परमेश्वर उद्धार करतो.यावेळी पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.