जालना । प्रतिनिधी – जालना शहरातील अनेक मुख्य रस्त्यासह वस्तीमधील प्रमुख रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली होती. रस्त्यावर अत्यंत मोठमोठे खड्डे पडले असल्याने सदरील रात्यावरून जाणे-येणे साठी शहरातील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत होता, खराब, खड्डेमय झालेले रस्ते तात्काळ सिमेंटीकरण करणेसाठी नागरिकांची मागणी होती. केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नाने जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अतुलजी सावे यांनी रु.27.31 कोटी मंजूर केले आहे.
यामध्ये जालना न.प. हद्दीतील ओव्हर ब्रिज ते अंबड चौफुली पर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरण करणे (5. कोटी), जालना न.प. हद्दीतील द्वारकानगर येथे प्रकाश देवडे यांचे घर ते शिंदे यांचे घर घरापर्यंत सी.सी. रस्ता व भूमिगत नालीचे बांधकाम करणे. (65 लक्ष), जालना शहरातील प्रभाग 29 येथील पवार यांचे घर ते श्री.वानखेडे यांचे घरापर्यंत सी.सी. रस्ता बांधकाम करणे. (85),
छत्रपती संभाजीनगर रोड (लक्कडकोट) ते देहडकर वाडी पर्यंत पर्यंत भूमिगत नालीसह सी.सी.रस्ता बांधकाम करणे.(1.27 कोटी), नाथनगर जवळी एस.आर.पी.एफ. गेट पर्यंत सी.सी.रस्ता बांधकाम करणे. (2.13 कोटी), भाग्यनगर येथील ओव्हर ब्रिज पासून ते आश्लेषा किड्स शाळेपर्यंत व्हाया डॉ.प्रभू हॉस्पिटल पर्यंत सी.सी.रस्ता भूमिगत नालीसह पेव्हर ब्लॉक बसविणे (2.00 कोटी), राजुरी कॉर्नर ते काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत भूमिगत गटार सह पेव्हर ब्लॉक व सी.सी.ट्रिमिक्स रस्ता करणे. (2.00 कोटी), शनी मंदिर चौक ते बाजार पोलीस चौकी व्हाया आनंदी स्वामी मंदिरा पर्यंत सी.सी.ट्रिमिक्स रस्ता करणे. (65 लक्ष), प्रभाग क्र.25 मधील मिसाळ टॉवर मध्ये मिसाळ टॉवरजवळील सी.डी. वर्क व नाल्याचे बांधकाम करणे. (27 लक्ष), अग्निशमन सेवा चे बळकटीकरण करणे. (2.00 कोटी), प्रभाग क्र.23 मधील निरामय हॉस्पिटल ते सौ.संध्या देठे नगरसेविका यांचे संपर्क कार्यालया पर्यंत भूमिगत नालीचे बांधकाम करणे. (25 लक्ष), चंदनझिरा येथील पंचशील बुद्धविहाराच्या परिसरात सी.सी. फ्लोअर चे काम करणे. (16 लक्ष), यासह अनेक प्रमुख रस्त्याचे सी.सी. रोडचे बांधकाम करणेसाठी जिल्हा वार्षिक योजना 2023 चे निधी अंतर्गत केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नातून मा.ना.अतुलजी सावे यांनी रु.27.31 कोटी निधी मंजूर झाल्याने शहरातील अनेक रस्त्याचा कायापालट होणार असून रस्ते गुळगुळीत होणार आहे. रस्त्याच्या सिमेंटीकरण करणेसाठी निधी मंजूर केल्याने शहर वासियांनी केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब दानवे यांचे आभार मानले आहे.