जालना । प्रतिनिधी – गत 20 फेब्रुवारी 2023 पासून जंतर-मंतर दिल्लीमध्ये चालू असलेल्या अनिश्चित कालीन धरणा प्रदर्शन ला समर्थन देण्यासाठी जालना जिल्ह्यातील सर्व भारतीय माजी सैनिक एकत्र झाले जिल्हा सैनिक कार्यालयात जमा होऊन नंतर जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत माजी सैनिकांची रॅली पोहोचली व शांततापूर्ण स्थितीमध्ये जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. वन रँक वन टेन्शन भाग दोन मध्ये सैनिक जवान आणि ऑफिसर यांच्यामध्ये जो मोठा फरक मिलिटरी सर्विस पे मध्ये ठेवलेला आहे तो समान करण्यासाठी जंतर-मंतरवर दिल्लीमध्ये धरणा प्रदर्शन चालू आहे त्यांना समर्थनासाठी सर्व संघटना एकमताने भारतीय माजी सैनिक जालना जिल्हा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले त्यात नंदकिशोर टोपे पद्माकर चंदनशिवे चंद्रकांत खरात दिनकर थोटे भीमराव चाटे काशिनाथ पंडित बबन शिंदे रामचंद्र धुमाळ जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून व बुलढाणा जिल्ह्यातील जवळपासच्या तालुक्यातील सर्व माजी सैनिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित झाले होते.