ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड प्रतिभा त्यास वाव देण्याचे काम शिक्षक करताहेत – तहसीलदार कंकाळ, खानापूर शाळेत सप्तरंग कार्यक्रम उत्साहात

13

टेंभुर्णी । प्रतिनिधी – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये ही प्रचंड प्रतिभा असून या प्रतिभेला वाव देण्याचे काम शिक्षक करतात.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी उच्च पदावर पोहचले असल्याचे प्रतिपादन जाफराबाद चे तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी गुरुवारी ता.30 केले.खानापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या सप्तरंग 2023 वार्षिक स्नेह संमेलन च्या उदघाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.यावेळी माजी शिक्षण सभापती राजेश चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर गाढे,सरपंच निवृत्ती जाधव, शाळा समिती अध्यक्ष सुभाष तायडे,विस्तार अधिकारी रामकुमार खराडे, शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष भगवान भालके, गट समन्वयक वसंता शेवाळे, केंद्रप्रमुख गजानन मांटे, डी के खरात,सुधाकर चिंधोटे,डी ई नागरे, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन मुकुंद औटी, दिनकर भोसले , व्हॉइस चेअरमन प्रदिप ताठे,संचालक गणेश पवार, प्रदिप साळोख, दिपक चव्हाण, विजय वैद्य, काशिनाथ उखर्डे, दामोधर डोईफोडे, धनंजय मुळे, गजानन चाटे, रामकृष्ण गीते, एम. के. वायाळ, एन. डी. देशमुख, भगवान शेळके, सुखदेव काकडे, भगवान चव्हाण, मधुकर गोफणे, संदिप जाधव, किशोर महाजन, संदिप कदम, सुभाष मांटे, कृष्णा दिवटे, पवन बंगाळे, जयदीप विघ्ने, रामदास डिघोळे, दिपक इंगळे, सुनील पवार, सिद्धेश्वर लंगोटे, तुळशीराम इघारे,सैनिक प्रदिप तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना श्री कंकाळ म्हणाले कि लोकसभागातून शाळा विकसीत करण्याचा आदर्श पॅटर्न खानापूर च्या ग्रामस्थांनी पुढे आणला आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक,पालक व विद्यार्थी असा त्रिकोण साधला गेला पाहिजेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विनोद कळंबे यांनी केले. यावेळी विविध शिक्षक संघटना पदाधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक व सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवबा मल्हारी, संदेसे आते है, जिस देश मै गंगा रहता है, लाल दिव्याच्या गाडीला, आई भवानी, सख्खी सासू गेली यासह विविध देशभक्ती, राष्ट्र भक्ती, हिंदी मराठी चित्रपट गीतांवर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्ये सादर केली. रसिक श्रोत्यांनी यावेळी 64200 रुपये बक्षीसाची यावेळी मुक्त उधळण केली. कार्यक्रमासाठी सुभाष तायडे, अरुण शेळके, गजानन शेळके, कैलास तायडे, दमोता तायडे, ऋषी शेळके, रामदास शेळके, बळीराम शेळके, चंदू शिंदे, विलास शेळके, शिवहरी शेळके,भरत शिंदे, नंदकिशोर तायडे, अशोक शेळके, विष्णू शेळके, महादू शेळके, दमोता गुलाबराव तायडे, नारायण तायडे, गौतम मोरे, दिनेश डोईफोडे, शारदा कायंदे, रामकृष्ण गीते, सोपान शिंदे यांनी परिश्रम घेतले.