भ्रष्टाचाराच्या विरोधात फुलंब्रीच्या मंगेश साबळे सारखे बहाद्दर प्रत्येक गावातुन एकत्र येणे गरजेचे आहे – बोरशे गुरुजी

13

भोकरदन | प्रतिनिधी – फुलंब्री पंचायत समिती समोर आंदोलन करणारा मंगेश साबळे सरपंच हा या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधातला एक प्रतिनिधी आहे भ्रष्टाचाराचे चिड असणारे आता अनेक लोक समाजामध्ये आहेत परंतु ते भ्रष्टाचाराचा विरोध करू शकत नाही आणि त्याला तोंड देऊ शकत नाही मनात ज्यावेळेस भ्रष्टाचाराबद्दल अतिशय चीड असते आणि समाजसेवेची भावना प्रखर असते त्यावेळेसच मंगेश साबळे सारखे पाऊल उचलले जाते असे पाऊल उचलणे हे कोण्या आयर्‍यागैर्‍याचे काम नाही. संपूर्ण प्रशासनच आता भ्रष्ट झालेले आहे. विश्वास कोणावर ठेवायचा ही सिस्टम बदलणे आवश्यक आहे. यामध्ये गरीब जनता होरपाळल्या जाते परंतु या भ्रष्टाचाराची पाळीमुळे एवढी वाढलेली आहेत साध्या शिपायापासून ते मंत्रालयापर्यंत याची लिंक आहे.मंत्रालयात बसलेले करोडोपती हेच भ्रष्टपती आहेत त्यांचे या कर्मचार्‍यांना अभय आहे प्रमुखाने जर भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई सुरू केली तर कोणाची मजाल आहे भ्रष्टाचार करण्याची माननीय पंतप्रधानांनी सुद्धा लाल किल्ल्यावरून घराणेशाही आणि भ्रष्टाचार या दोन मोठ्या समस्या असल्याचे म्हटलेले आहे परंतु ठोस उपाययोजना माननीय पंतप्रधान करण्यास तयार नाहीत उलट पक्षी भ्रष्टाचारांना आपल्या पक्षांमध्ये सामावून घेण्यासाठी ते पुढाकार घेतात आणि सामावून घेतात. काही लोकांमार्फत निर्लज्जेपणे पुन्हा सांगितल्या जाते की आमच्याकडे भ्रष्टाचार्यांना स्वच्छ करण्याची मशीनआहे घराणेशाहीने तर सत्ताधारी पक्षात कळस गाठलेला आहे असे म्हटले जाते की लग्नामध्ये वरबाप जर बेशीस्तीने वागणारा आणि व्यसनी असला तर बाकीच्या वर्हाडा कडुन काय अपेक्षा करणार ? सध्याची परिस्थिती पाहता देशातील भ्रष्टाचार हटवण्याची परिस्थिती नसून उलट भ्रष्टाचाराला संरक्षण आणि प्रोत्साहन देण्याची प्रवृत्ती आहे.सामान्य व्यक्ती जेव्हा आपले काम करून घेण्यासाठी कार्यालयामध्ये जाते त्यावेळेस त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते कर्मचार्‍यांचे लक्ष फक्त आलेल्या नागरिकाच्या खिशाकडे असते आणि येणार्‍या नागरिकाकडे शिकार आली या पद्धतीने हे लोक पाहत असतात खुर्चीवर बसलेले जणु काही भ्रष्टाचाराचे अधिकृत लायसन घेऊन खुर्चीवर बसलेले आहेत अशी त्यांची धारणा असते. हे पैसे घेतल्याशिवाय गरीब दुबळ्यांचे काम करत नाहीत असो मंगेश भाई आपण केलेलं आंदोलन जे भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलन अतिशय अभिनंदनास पात्र आहे आपण एकटे नाहीत समाजातील अनेक लोक आपल्या सोबत आहेत मी बोरसे गुरुजी आम आदमी पार्टी जालना जिल्हा उपाध्यक्ष तुमच्यासोबत आहे भैय्या ही लढाई सोपी नाही भ्रष्टाचाराची यंत्रणा फार मोठी आहे ही यंत्रणा एकमेकांना सहकार्य करत असते भ्रष्ट व्यक्तींच्या मागे अनेक लोक उभे राहतात परंतु विरोध करणार्‍याला सुरुवातीला हेच लोक हसतात वेळ आली तर पळून जातात