सिद्धार्थ महाविद्यालयाचे श्री. भगवान धवलिया सेवा निवृत्त

29

जाफराबाद | प्रतिनिधी – जाफराबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयाचे ग्रंथालय लिपिक श्री भगवान पुरुपचंद धवलिया यांचा सेवा पूर्ती निरोप समारंभ सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष मा.दादासाहेब म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. शाम सर्जे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
सर्वप्रथम श्री. भगवान धवलिया यांचा सपत्निक यथोचित सत्कार सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष मा.दादासाहेब म्हस्के यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी ग्रंथालय प्रमुख प्रा. अशोक पठाडे यांनी श्री. भगवान धवलिया यांचा लाभलेला सहवा, त्यांचा सेवेचा प्रवास या विषयी गौरवोद्गार काढतांना असा सहकारी होणे नाही असे आपले मत व्यक्त केले.
यावेळी उपप्राचार्य, डॉ. सूनिल मेढे. कु. धवलिया यांनी आपल्या मनोगतात श्री. भगवान धवलिया यांच्या कार्याचा व कौटुंबिक सहकार्याचा उहापोह केला.
मा. दादासाहेब म्हस्के यांनी श्री. भगवान धवलिया हे कष्टाळू, प्रमाणिक, जिद्दी आणि मनमिळावू असल्याने त्यांचे हे गुण इतर कर्मचार्यांना आदर्शवत आहोत असे आपले विचार व्यक्त करून भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्या.
या सेवापूर्ती समारंभास उत्तर देतांना भगवान धवलिया यांनी मा. दादासाहेब व महाविद्यालयाप्रति आदरभाव व्यक्त करून महाविद्यालयाच्या सर्व कर्मचार्यांच्या ऋणात राहू इच्छितो असे सांगून येथून पुढेही मी महाविद्यालयास सेवा देण्यास तत्पर असेल असे मत आपल्या मनोगतातून मांडले.
या सेवापूर्ती समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य, डॉ. शाम सर्जे यांनी श्री. भगवान धवलिया यांच्या कार्याचा गौरव करतांना त्यांचा लाभलेला सहवास विसरता येणार नाही. त्यांची उनीव महाविद्यालयाला जानवेल असी खंत व्यक्त करून भावीवाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास उपप्राचार्य, डॉ. रमेश देशमुख. उपप्राचार्य. प्रा. विनोद हिवराळे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मोठ्या प्रमाणात श्री. भगवान धवलिया यांचे आप्तस्वकीय, प्रतिष्ठित नागरिक, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुदाम पाटील यांनी केले. तर आभार प्रा. सूनंदा सोनूने यांनी मानले.