जालना | प्रतिनिधी – सकल जैन समाजाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे श्री भगवान महावीर जन्मकल्याणकाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत दि. 4 एप्रिल रोजी जालना शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमात महासती डॉ. पू. मधुबालाजी , सरल स्वभावी पू. प्रशांतकंवरजी, मधुर व्याख्यानी पू. नमिताजी, जैन दिवाकरीय ओजस्वी वक्ता पू. अमितसुधाजी, मधुर व्याख्यानी पू. अनुप्रेक्षाजी, प. पू. दर्शनप्रभाजी, प. पू. गुलाबकवरजी, प. पू. हर्षीताजी आदींचे पवित्र सानिध्य लाभणार आहे. मंगळवारी सकाळी 8.45 वाजता महावीर चौक येथे ध्वजारोहण होणार असून, त्यानंतर येथून भव्य शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. महावीर चौक, मॅजेस्टिक टॉकिज रोड, पाणीबेस, झेंडा, काद्राबाद (सराफा), अहिंसा मार्ग, शोला चौक, रहेमान गंज, जवाहर बाग, बडी सडक, राम मंदीर असा या शोभायात्रेचा मार्ग राहणार असून, गुरु गणेश तपोधाम येथे शोभायात्रेचा समारोप होणार आहे. शोभेयात्रेत विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. 11.30 वाजता संत महतांचे मंगलमय प्रवचन होणार असून, त्यानंतर 11.45 ते 2.30 या वेळेत गुरु गणेश मंगल कार्यालयात प्रसादीचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवच्या सर्व कार्यक्रमास भाविकांनी आवर्जुन उपस्थित राहून, शोभा यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन सकल जैन समाजाच्यावतीने संजय लव्हाडे, सुदेश सकलेचा, अशोक बिनायकिया, माणिकचंद कासलीवाल, चैनराज सेठिया, विजय जैन (श्रीश्रीमाळ), विनयकुमार आबड, सुरेशचंद मुथा, उत्तमचंद बनवट, मनोज मोदी, प्रमोद देसरडा, प्रेमचंद कासलीवाल, प्रवीण पहाडे, शिखर लोहाडे, संतोष बडजाते, पवन सेठिया, धमेंद्र धोका, जिनदास वायकोस, चैतन्य वायकोस, सुभाष वायकोस, सुरेश मरलेचा, महावीर रुणवाल, पवनराज सुराणा, नरेन्द्र बोरा, संजय मुथा, डॉ. धरमचंद गादिया, विजय सावजी, कचरुलाल कुंकूलोळ, प्रकाश सुराणा, गणेश काले, चेतन बोथरा, पंकज खिंवसरा, महेंद्र गादिया, अजय बोरा, सुनील सेठीया, अजित छाबडा, योगेश पाटणी, रविंद्रकुमार् संचेती, आकाश बोथरा, सतीश कोटेचा, अक्षय संचेती, राकेश गांधी, विकास रेदासनी, गौतम संचेती, राहुल बोरा, दर्शन पारख व सकल जैन समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.