जाफराबाद । प्रतिनिधी – जाफ्राबाद तालुक्यांतील माहोरा येथे शनिवारी ग्रामसंसद कार्यालयात सरपंच गजानन पाटील लहाने उपसरपंच सैय्यद हबीब सै. कमाल यांच्या ःख़त्र्र्ूह्नर्त्र्ैंग्नंच् ङ्मग्नर्ज्ज्ैंग्न क्क्रुर्घ्ैंच्ंच् बैठक आयोजित करण्यांत आली होती. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने फौजदार प्रल्हाद मदन म्हणाले की, नागरीकांनी येणार्या सण व उत्सव एकोप्याने राहून शांततेत साजरे करावे तसेच तरुण युवकांनी व्हाट्सएप, फेसबुक, मोबाइलवर कोणतेही चुकीचे फोटो अथवा वीडियो पोस्ट करू नका. चुकीच्या संदेश मुळे लाखों घर उध्वस्त होतात हे तरुणांनी लक्षात ठेवावे. चुकीच्या पोस्टमुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार्या व्या समाज कटकांना कुठलीही माफी दिल्या जाणार नाही. असे तेढ निर्माण करणार्या साजकंटकाच्या विरोधात सायबर गुन्हे अंतर्गत गुन्हे दाखल करून कड़क कार्यवाही केल्या जाईल तसेच आगामी काळात 14 एप्रिल. मुस्लिमाचा पवित्र रमजान ईद महिना असून नागरीकांनी सण साजरे करतांना शांततामय वातारणात सामाजिक सलोखा राखावा व शांतता अबाधित ठेवावी बैठकीस पोलीस विलास भुतेकर, पोलीस जमादार गजानन गावडे, वैद्य भानदास बोर्डे, शिवसेना विभाग प्रमुख बाबासाहेब बोरसे, दादाराव गडकरी, हर्षल जाधव, चंदु सिरसाठ, सुभाष लहाने, कैलास लहाने ग्रा.प. सदस्य भास्कर सोनुने, सुखदेव साबळे, सैय्यद दिलावर महेबुब पठाण, भगवान वाघ, लालखाँ मिस्तरी यांच्यासह सर्व समाजातील नागरीक उपस्थित होते. सरपंच गजानन लहाने, उपसरपंच सय्यद हबीब सै. कमाल, भानुदास बोर्डे यांनीही यावेळी नागरीकांना सर्व सण व उत्सव शांतता राखत साजरे करावे असे आवाहन केले. उपस्थितांचे आभार दादाराव गडकरी यांनी मानले.