जालन्यात 16 एप्रिल रोजी महाराष्ट्र मारवाडी समाजाचे 4थे अधिवेशन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन

32

जालना । प्रतिनिधी – महाराष्ट्र मारवाडी समाजाचे 4थे अधिवेशन दिनांक 16 एप्रिल रोजी जालना शहरात आयोजित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे.
याबाबत अधिक माहिती देतांना अधिवेशनाचे मुख्य निमंत्रक विरेंद्रप्रकाश धोका यांनी सांगितले की, मारवाडी समाजाच्या या अधिवेशनाचे आयोजन महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी संमेलन व महाराष्ट्र प्रदेश मारवाडी युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. मारवाडी समाज संघटन, समाजात वाढत चाललेली विभक्त कुटुंब पद्धतीची धारणा, वाढते घटस्फोट, समाजाची राजकीय पिछेहाट आदी विषयांवर या अधिवेशनात मंथन होणार आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी संमेलनाचे अध्यक्ष राज के. पुरोहित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असलेल्या या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतूल सावे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री संदीपान भुमरे ,आमदार कैलास गोरंट्याल,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, माजी मंत्री आमदार राजेश टोपे, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, माजी मंत्री अर्जूनराव खोतकर आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे.
या अधिवेशनाचे निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मारवाडी समाजातील अकरा व्यक्तींचा मारवाडी समाजरत्न म्हणून गौरव करण्यात येणार आहे. या अधिवेशनास मारवाडी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष घनश्यामदास गोयल, मुख्य निमंत्रक विरेंद्रप्रकाश धोका, मारवाडी समाजाचे प्रांतिय मंत्री निकेश गुप्ता, मराठवाडा प्रभारी चंदुलाल बियाणी, ड. मुकेश गोयंका, महाराष्ट्र प्रदेश मारवाडी युवा मंचचे प्रदेशाध्यक्ष उमेश पंचारिया, मारवाडी संमेलनाचे जालना जिल्हाध्यक्ष सुभाषचंद्र देविदान,मारवाडी युवा मंचचे जालना नगर अध्यक्ष महावीर जांगीड,मारवाडी युवा मंचचे नूतन प्रदेशाध्यक्ष कैलास राठी, महेश भक्कड,सुदेश करवा, उमेश बजाज, मनीष तवरावाला, पियुष होलानी,पवन जोशी, रमेश अग्रवाल, सुनील राठी, सुरेंद्र मुनोत,सुरेंद्र चेचानी,चेतन बोथरा,संजय बाहेती, गौतमसिंग मुनोत, दिनेश बरलोटा, शाम लखोटिया, नितीन तोतला,विजय जैन, रमेश मोदी आदींनी केले आहे.