जालना । प्रतिनिधी – जालना जिल्हा अल्पसंख्यांक विभागास दिलेल्या निधीस मुदत वाढ देण्याची मागणी आ. कैलास गोरंट्याल, शिक्षक मतदार संघाचे आ. विक्रम वसंतराव काळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात, जालना जिल्हा अंतर्गत अल्पसंख्यांक विभागाच्या विविध योजनेअंतर्गत निधी वितरीत करण्यात आलेला होता. सदरील योजनेअंतर्गत डॉ. जाकीर हुसेन मदरसा मॉर्डनयझेशनल योजना व अल्पसंख्यांक शाळा अंतर्गत पायाभूत सुविधा योजना कार्यान्वयीत होणार होत्या. जालना जिल्यातील अनेक अल्पसंख्यांक संस्थांनी या योजनेच्या मान्यतेसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, जालना यांच्याकडे विहीत मुदतीत पाठविले होते. परंतु नियोजन विभागाच्या हलगर्जीपणामुळे सदरील प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झालेले नाही. त्यामुळे सदरील योजनेसाठी राखिव असलेला निधी इतर जिल्हयाकडे वळविण्यात आला आहे. तेव्हा वरील डॉ. जाकीर हुसेन मदरसा मॉर्डनयझेशनल योजना व अल्पसंख्यांक शाळा अंतर्गत पायाभूत सुविधा योजना या अल्पसंख्यांक योजनेसाठी राखिव असलेल्या निधीस मुदतवाढ देवुन निधी तात्काळ वितरीत करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.