मौलानावर हल्ला करणार्‍यांवर कठोर कारवाईची समाजवादी पार्टीची मागणी

79

जालना । प्रतिनिधी – जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आन्वा गावातील रहिवासी मौलाना हाफिज सय्यद जाकेर सय्यद खाजा यांना अज्ञात व्यक्तींनी गैर मार्गाने मशिदीत प्रवेश करुन धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मौलाना हे गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक व गंभीर असून त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविल्यात आले होते त्यांचावर सध्या घाटी येथे उपचार सुरु आहे. या प्राणघात हल्ला करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस अधिक्षक यांच्याकड समाजवादी पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आन्वा गावातील जामा मशीदचे मौलाना पवित्र कुराणचे पठण करतांना अज्ञातांनी त्यांच्यावर मशिदित येऊन धार धार ब्लेडने दाढी कापून त्यांच्या तोंडावर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला करुन गंभीर जखमी केले. या हल्लाखोर आतंकवादी लोकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची समाजवादी पार्टीच्यावतीने पक्षाचे जालना जिल्हाध्यक्ष शेख नबी सिपोराकर यांनी केली आहे.