महाविकास आघाडीच्या सभेस पंधरा हजार कार्यकर्ते जाणार – आ. गोरंट्याल

24

जालना । प्रतिनिधी – देशातील लोकशाहीच्या मजबुतीसाठी रविवारी रोजी आयोजित महाविकास आघाडीच्या विराट सभेस जालना विधानसभा मतदार संघातून आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते रवाना होणार असल्याची माहिती जालना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी दिली आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या आडमुठ धोरणामुळे सामान्य जनता होरपळून निघाली आहे. महागाईच्या आगडांब उसळल्याने शेतकरी आणि गोरगरीब व तसेच कामगारांचे जगणे असह्य झाले आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे तरूणवर्ग सैरभैर झालेला असतांना सरकार मात्र दोन समाजात तेढ निर्माण करून विष पेरण्याचे काम करीत आहे. याच्या विरोधात महाविकास आघाडीने रणशिंग फुंकले आहे. दि. 2 एप्रिल रविवार रोजी सायंकाळी 5 वाजता मराठवाडा सांस्कृतीक मंडळ मैदान छत्रपती संभाजीनगर येथे विराट जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. जालना विधानसभा मतदार संघाचे आ. कैलास गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली जालना शहर व ग्रामीण भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक पार पडली. या सभेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्य संख्येने उपस्थित राहण्यासाठी नियोजन करण्यात आले.
जालना विधानसभा मतदार संघातून जवळपास 12 ते 15 हजार कार्यकर्ते रवाना होण्यासाठी सज्ज झाले असल्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी बैठकीत सांगितले. या बैठकीत शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद तालुकाध्यक्ष राम सावंत, युवानेते अक्षय गोरंट्याल, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नंदाताई पवार, माजी नगरसेवक महावीर ढक्का, जगदिश भरतीया, रमेश गौरक्षक, राहुल हिवराळे, विष्णु वाघमारे, जिवन सले, अरूण घडलिंग, अरूण मगरे, अशोक भगत, किशोर गरदास, दत्ता घुले, शेख शकील, सुषमाताई पायगव्हाणे, शितलताई तनपूरे, मंगलताई खांडेभराड, मथुराबाई, शेख शमशोद्दीन, सोळुंके, शेख इब्राहीम, वैभव उगले, दत्ता शिंदे, कृष्णा पडोळ, संतोष देवडे, ड. गोपाल मोरे, किशोर कदम, गुलाबखा पठाण, नारायण वाढेकर, शिवाजी गायकवाड, गणेश चांदोडे, आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.