परतूर । प्रतिनिधी – परतुर रेल संघर्ष समितीच्या वतीने रेल प्रबंधक अमरदिप यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. माहितीच्या अधिकारात प्राप्त माहितीनुसार परतुर रेल्वे स्थानकाचे वार्षिक उत्पन्न चार कोटीच्या घरात आहे. त्यासोबतच परतूर येथे गुरुद्वारा, प्राचीन लक्ष्मी नरसिंह मंदिर व साई मंदिर असून येथील विविध समाजाचे लोक व्यवसायानिमित्त उत्तर भारत व दक्षिण भारतात जात असतात, त्या अनुषंगाने परतुर येथे सचखंड, नरसापुर, अजमेर या सुपरफास्ट गाड्यांना थांबा देण्यात यावा. अजंता एक्सप्रेस व अन्य रात्रीच्या गाड्यांचा थांबा पूर्ववत करणे. तसेच परतुर रेल्वे स्थानकावर शौचालय, सुरक्षित भिंतीचे बांधकाम, प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर डिस्प्ले, सीसीटीव्ही, सर्व सुविधांनी युक्त प्रतिक्षालय सुरू करण्याची गरज आहे. तसेच तत्काळ तिकीट सिस्टीम मध्ये बुकिंग क्लर्कच्या लापरवाहीमुळे तिकीट वेटिंग होत आहे. त्या अनुषंगाने तत्पर बुकिंग क्लर्कची नियुक्ती करून तात्काळ तिकीटसाठी टोकन सिस्टीम सुरू करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. या सर्व मागण्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जनरल मॅनेजर सिकंदराबाद, डीआरएम नांदेड आदिना वेळोवेळी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाची कॉपी रेल्वेमंत्री व जनरल मॅनेजर यांना पाठविण्यात आली आहे.
यावेळी परतुर रेल संघर्ष समितीचे डॉ. स्वप्नील बी. मंत्री, दीपक कुमार अग्रवाल, शरद भारुका, अभिजीत जोशी, सर्वेश मोर, प्रणय मोर, गणेश अग्रवाल, डॉ. हरिप्रसाद ढेरे, सौरभ बगडिया निहित सकलेचा, डॉ. महेंद्र पाटील, गौतम कोटेचा, डॉ. दीपक कंदोई, डॉ. पद्माकर घोरपडे, राजु भारूका, अर्जुन पाडेवार, शाम लोमटे, डॉ. अशोक शेळके, सखाराम कुलकर्णी, डॉ. शितलकुमार लाहोटी, नारायण मुंदडा, अश्विन दायमा, सत्यम झंवर, महेश लाहोटी, शाम चौधरी, दत्ता ढवळे, कपिल अग्रवाल, गौरव लाठी सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.