रामेश्वर खांडेभराड यांचा माळी महासंघातर्फे सत्कार

38

टेंभुर्णी । प्रतिनिधी – टेंभुर्णी येथील शिवसेना नेते श्री रामेश्वर भाऊ खांडेभराड यांची शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाफराबाद तालुक्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा माळी महासंघ टेंभुलर्णी शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. माळी समाजातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍यांचं माळी महासंघ नेहमीच कौतुक करत असते अशा भावना माळी महासंघाचे पदाधिकारी शिवाजीराव खांडेभराड यांनी यावेळी मांडल्या. या सत्कार समारंभ वेळी माळी महासंघाचे शहर अध्यक्ष शंकर मुळे, गजानन भाऊ राऊत, शिवाजीराव खांडेभराड ,शिवसेना शहराध्यक्ष गजानन भाऊ मुळे व माळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते . आभार प्रदर्शन माळी महासंघाचे पदाधिकारी गजानन भाऊ राऊत यांनी केले.