जालना/प्रतिनिधी : नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडीया यांच्या वतीने दि. 31 मार्च ते 5 एप्रिल 2023 दरम्यान हरीयाणा येथे पहिली राष्ट्रीय फास्ट फाईव नेटबॉल स्पर्धा आयोजीत करण्यात आली असुन सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचा संघ भंडारा येथुन रवाना झाला असुन महाराष्ट्राच्या संघामध्ये जालन्याच्या दोन खेळाडुंची निवड झालेली आहे. पुरूष संघाचा कर्णधार म्हणुन जालना जिल्ह्याचा नेटबॉल खेळाडु आकाश पवार याला जबाबदारी देण्यात आली आहे तर महिला संघा मध्ये ट्विकंल स्टार इंग्लीश स्कुल बदनापुरच्या क्रीडा शिक्षीका श्रीमती किरण पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे. दोन्ही खेळाडुंना जालना जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे सचिव शेख चाँद पी.जे. यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले.
महाराष्ट्र – पुरूष संघ ः आकाश पवार (कर्णधार, जालना), चंदन गायकवाड (उप कर्णधार, नांदेड), राजेश महाले (वाशिम), हनमंत मोरे (पुणे), वैभव ताटे, प्रणव यादव, आशिष गायकवाड (परभणी), शैलेश कुकडे, कार्तिक मरसकोल्हे (भंडारा), सुयश टेकाळे (लातूर), प्रशिक्षक – विलास पराते (भंडारा), व्यवस्थापक – वैभव ढगे (नागपूर)
महीला संघ ः सना शेख (कर्णधार, भंडारा), गायत्री भुसारी (उप कर्णधार, अमरावती), किरण पाटील (जालना), पायल कुंभारकर, सपना टिचकुले, उज्वला चौधरी (भंडारा), वैष्णवी वानखेडे, हनी देशमुख, अश्लेषा गिरी, पूर्वा सरोदे (अमरावती), प्रशिक्षक – यामिनी अरक (अमरावती), व्यवस्थापक – साक्षी कटकवार (भंडारा)
सर्व खेळाडुंची निवड राज्य संघटनेचे अध्यक्ष बिपीनभाई कामदार, सचिव डॉ. ललित जिवानी यांच्यावतीने करण्यात येवुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत, तसेच सदर खेळाडुंचे प्रशिक्षण शिबीर घेवुन त्यांना राष्ट्रीय स्पर्धेकरीता तयार करण्यासाठी राज्य संघटनेचे सहसचिव शाम देशमुख यांनी विशेष परीश्रम घेतले.
दोन्ही खेळाडुंनी जिल्ह्याच्या नावलौकीकात वाढ केल्याबद्दल त्यांचे जेष्ठ समाजसेवक राणा ठाकुर, जालना जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक बाला भैय्या परदेसी, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, क्रीडा अधिकारी शेख मोहम्मद, रेखा परदेसी, संतोष वाबळे, देवगीरी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बबन दादा सोरटी, नगरसेवक जयंत भोसले, युवा नेते अक्षय भैय्या पवार, माजी नगरसेवक मिर्झा अनवर बेग, नगरसेवक शेख शकील, नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे, उमेशचंद्र खंदारकर, सुभाष पारे, तुषार गर्जे, जयकुमार वाहुळे, मंगेश सोरटी, संतोष वाघ, नितीन जाधव, शेख समीर, सोहेल खान यांनी अभिनंदन केले आहे