जालना । प्रतिनिधी – जालना शहरातील शनिमंदीर भागातील शेख ज़ुलफेखार यांची कन्या शिबा शेख ज़ुलफेखार वय 7 वर्ष हिने पवित्र रमजान महिन्याचा व आपल्या जीवनाचा पहिला रोजा धरला. शिबा यांनी आपल्या जिवनाचा पहिल्या रोजा पूर्ण केल्या बद्दल परिसरातील नागरिकांच्या वतीने सुद्धा शिबा शेख ज़ुलफेखार याचे कौतुकाचा वर्षाव होत असून ज्येष्ठांकडून तिला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. लहान चिमुकलीने रोजा ठेवला याचे आनंद त्यांच्या कुटुंबियांच्या चेहर्यावर साफ दिसत होते.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून मार्च एप्रिल महिन्यात कडक उन्हामुळे जीवाची लाही लाही होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासून तहान भागवली जाते परंतु रमजानच्या रोजा मध्ये अन्न आणि पाणी दोन्ही व्रज्य असल्याने रमजानचे रोजे मोठ्या माणसांना सुध्दा कठीण जातात. मुस्लिम समाजात पवित्र असणार्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो या उष्णतेचा मोठ्या माणसांना देखील खूप त्रास होतो त्यात या सात वर्षांची चिमुकलीने पहिला रोजा ठेवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठेवला. त्यामुळे या छोट्याशा मुलीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.