टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये मौलानांची बैठक

33

टेंभुर्णी | प्रतिनिधी – येथील पोलीस स्टेशनमध्ये गुरूवारी गावातील सर्व मशिदींच्या मौलानांची बैठक बोलाविण्यात आली होती. अन्वा येथील प्रकरणाबाबत पोलीसांचा तपास सुरू आहे. तेंव्हा आगामी काळात येणारया सणोत्सवासाठी सर्वांनी शांततेचे सहकार्य करावे असे आवाहन यावेळी पोलीस स्टेशनच्या प्रभारी एपीआय वैशाली पवार यांनी केले. सध्या पवित्र रमजान चा महिना सुरू असल्याने त्यांनी सर्वप्रथम उपस्थित सर्वांना रमजान च्या शुभेच्छा दिल्या. टेंभुर्णी हे गाव जातिय सलोख्यासाठी प्रसिद्ध असून भविष्यात ही गावातील हा सामाजिक एकोपा अबाधित राहण्यासाठी मुस्लिम समुदायातर्फे पोलिस प्रशासनास संपुर्ण सहकार्य केले जाईल असे मत यावेळी शांतता कमिटीचे जेष्ठ सदस्य मोईन बागवान यांनी व्यक्त केले. अन्वा प्रकरणातील दोषी आरोपींचा त्वरीत तपास करावा अशी मागणीही यावेळी उपस्थित सदस्यांनी केली.
बैठकीला मर्कज मस्जिद चे इमाम हाफीज नासेर, मुफ्ती जाबीर, हाफीज सईद, हाफीज फारूख, माजी उपसरपंच फैसल चाऊस, शांतता कमिटी जेष्ठ सदस्य मोईन बागवान, शेख नसीम, शेख अशपाक, अब्दुल नबी, मसुद बागवान, तारेख सिद्दीकी, रय्यान चाऊस, पो.कॉ. मंगेश शिंदे आदिंची उपस्थितिती होती.