डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय नागरिक जयंती उत्सव समितीच्या स्वागताध्यक्षपदी आ. कैलास गोरंट्याल

24

जालना । प्रतिनिधी – जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय नागरिक जयंती उत्सव समितीच्या स्वागताध्यक्षपदी आमदार कैलास गोरंट्याल यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त जालना शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय नागरिक जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय नागरिक जयंती उत्सव समितीच्या स्वागताध्यक्षपदी आमदार कैलास गोरंट्याल यांची निवड केली आहे. या निवडीबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय नागरिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आमदार कैलास गोरंट्याल यांचा गुरूवारी ( दि. 30) सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष भास्कर रत्नपारखे, सचिव संतोष खरात, कार्याध्यक्ष शेख इब्राहिम आदींनी आमदार कैलास गोरंट्याल यांचा सत्कार केला. यावेळी युवा नेते अक्षय गोरंट्याल,तसेच जालना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वसंत जाधव, दत्ता घुले, बापू साळुंके, प्रदीप रत्नपारखे, प्रविण रत्नपारखे, महेंद्र रत्नपारखे, विध्यार्थ रत्नपारखे, दिनेश रत्नपारखे, आकाश खरात, पवन वाहुळ, धर्मा वाहुळ आदींची उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय नागरिक जयंती उत्सव समितीच्या स्वागताध्यक्षपदी निवड केल्याबद्दल आमदार कैलास गोरंट्याल यांनी उत्सव समितीचे आभार मानले. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती विविध सामाजिक कार्यक्रम- उपक्रम राबवून उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याचे आमदार गोरंट्याल यांनी यावेळी सांगितले.

भीम जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय नागरिक जयंती उत्सव समितीच्या वतीने जालना शहरात विविध कार्यक्रम- उपक्रम राबविले जाणार आहेत. गोरगरिबांना अन्नदान, गरजूंना कपडे तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार असून जयंतीनिमित्त काढण्यात येणार्‍या मिरवणुकीत विविध देखावे, लेझर शो आदीचे आयोजन करण्यात येणार आहे.

– भास्कर अण्णा रत्नपारखे अध्यक्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय नागरिक जयंती उत्सव समिती, जालना