मंठा । प्रतिनिधी – गोरगरीब,कष्टकरी, शेतकर्यांचा सण आनंददायी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या डबल इंजिन शासनामार्फत ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यात येत असून शंभर रुपयांमध्ये रवा साखर चणाडाळ व तेल या चार वस्तू मिळणार आहेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्यंत मंठा तालुक्यातील 30 हजार कुटुंबांपर्यंत आनंदाचा शिधा पोहोचेल असे प्रतिपादन माजीमंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केले
मंठा येथे माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला यावेळी बोलताना श्री लोणीकर म्हणाले की, राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरीत करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. हा आनंदाचा शिधा गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षांपासून वितरीत करण्यात येणार आहे. शासन वेगवेगळया योजनांच्या माध्यमातून गोरगरीब, कष्टकरी व शेतकर्यांना मदत करत आहे.
जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्रय रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व एक लिटर पामतेल हे शिधाजिन्नस देण्यात येणार आहे. हा आनंदाचा शिधा गुढीपाडवा, रामनवमी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षापासून ई-पॉस प्रणालीद्वारे 100 रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येणार आहे. सर्व अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना जोडून दिलेल्या रास्तभाव दुकानात जावून ई-पॉस मशीनवर आपला अंगठा प्रमाणित करुन शिधाजिन्नस संच प्राप्त करुन घ्यावेत असे आवाहन देखील श्री लोणीकर यांनी यावेळी शिधापत्रिका धारकांना केले
शिंदे-फडणवीस यांचे सरकार डबल इंजिन सरकार असून सर्वसामान्य जनतेच्या मनातील सरकार आहे या सरकारला सर्वसामान्य जनतेच्या समस्येची जाण असून नुकतेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या रक्कमेत वाढ केली आहे. तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘महिला सन्मान योजना’ सुरु केली असून या योजनेतंर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवास भाड्यात महिलांना 50 टक्के सवलत देण्यात आली असून या योजनेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महिलासाठी लवकर स्वतंत्र महिला धोरण देखील राबविण्यात येणार आहे. पुर्वी खेड्यापाड्यात महिलांना दूरवर पाणी घेण्यासाठी जावे लागत होते. परंतू केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या माध्यमातून जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात पाणी देण्यात येत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील शिंदे फडणवीस सरकार सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे देखील लोणीकर यावेळी म्हणाले
गुढीपाढवा, रामनवमी व आगामी येणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती यासह यादरम्यान येणारे सर्वधर्मीय सण गोरगरीबांना आनंदाने साजरे करता यावे, या सण उत्सवांच्या काळात गोरगरीबांना तोंड गोड करता यावे यासाठी शासनाने आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनामार्फत गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून मोफत अन्न धान्य देण्यात येत असून हे कोरोना काळापुरताच मर्यादित न ठेवता जोपर्यंत गोरगरीबांचे कोरोनाकाळातील संकट दूर होत नाही तोपर्यंत गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत रेशन धान्य देणार येणार आहे. केंद्र शासनाच्या विविध योजना प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे देखील श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे, मंठा तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ पंजाबराव बोराडे प्रल्हादराव बोराडे राजेश मोरे संभाजी खंदारे कैलास बोराडे विठ्ठलराव काळे, उध्दवराव गोंडगे, माऊली गोंडगे मुस्तफा पठाण कैलास चव्हाण, संतोष बोराडे अरुण खराबे कृष्णा खंदारे सुभाष बागल आतिष राठोड,दत्ता दहातोंडे,लक्ष्मण बोराडे, समंदर पठाण अन्साबाई राठोड मंठा तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिधापत्रिका धारक उपस्थित होते.