संजयनगरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

27

जालना | प्रतिनिधी – संजयनगरातील नूतन शाळेसमोरील हनुमान मंदिर प्रांगणात खूप वर्षानंतर दि. 6 ते 13 एप्रिल दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दैनंदिन कार्यक्रमात सकाळी 4 ते 6 काकडा भजन, 6 ते 7 विष्णुसहस्त्रनाम, 8 ते 9 जगन्नाथ महाराज शिंदे यांचे ज्ञानेश्वरी प्रवचन, 9 ते 10 नाष्टा, 11 ते 12 गाथा भजन, दु. 1 ते 2 भोजन, सायं 5 ते 6 हरिपाठ, रात्री 7 ते 8 भोजन, रात्री 9 ते 11 हरिकीर्तन होईल. गुरुवार, दि. 6 एप्रिल रोजी ह.भ.प.गोरक्षनाथ म. गायके, दि. 7 रोजी ह.भ.प. महंत महादेव म. गिरी, दि. 8 रोजी शिवचरीत्रकार ह.भ.प. राहुल म. बांदलकर, दि. 9 रोजी विनोदाचार्य ह.भ.प. समाधान म. खरात (बालकिर्तनकार), दि. 10 रोजी ह.भ.प.गणेश म. लोंढे, दि. 11 रोजी शिवचरित्रकार ह.भ.प. गजानन म. देठे, दि. 12 रोजी ह.भ.प. काका म. खैरे (आळंदी), दि. 13 रोजी ह.भ.प. रघुनाथ म. देशपांडे (वखारी) यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
या सप्ताहात मृदंगाचार्य- किरण महाराज औताडे (आळंदी देवाची) गायनाचार्य – प्रकाश महाराज शिंदे, किरण महाराज चोरमारे, मुरलीधर महाराज भोपळे, महेश महाराज काळे, सुशील महाराज काळे, शारदाताई सोनवणे, सतीश मते, राजु भुतेकर, पहारेकरी विणेकरी – ह.भ.प. नामदेव म. घुले टिम, भजनी मंडळ – शंकरनगर, संजय नगर, पुरुष भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ यांचा सहभाग असणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहात आयोजित केलेल्या कीर्तनाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महेश संपतराव नागवे मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.