शनिवारी राज्यस्तरीय जयभीम कविसंमेलन

27

जालना । प्रतिनिधी – टाऊन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ’साहेब बना अभियानअंतर्गत ’ दि. 1 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता नववे राज्यस्तरीय ंकविसंमेलन व स्मृतिशेष ड.कैलास रत्नपारखे जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे उदघाटन विख्यात चित्रकार श्रीधर अंभोरे यांच्याहस्ते होणार असून अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. उत्तम अंभोरे हे राहणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी मंगलताई धुपे, माजी सभापती गणेशसेठ रत्नपारखे, संघर्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रमोदकुमार रत्नपारखे, प्राचार्या वैशाली सरदार, सामाजिक कार्यकर्ते हरिश रत्नपारखे, ड. कल्पना त्रिभुवन, ड. विशाखा वाहुळे -बनकर यांची उपस्थिती राहणार आहेत. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ बी. एम. साळवे, उद्योजक संतोष दाभाडे आणि ज्येष्ठ पत्रकार भीमराव इंगळे यांना स्मतिशेष ड. कैलास रत्नपारखे जीवन गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. त्यानंतर डॉ. विशाल तायडे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कविसंमेलन होणार आहे. या कार्यक्रमास रसिकांनी उपस्थित राहावे,. असे आवाहन मुख्य संयोजक विद्या कैलास रत्नपारखे यांच्यासह महेंद्र बनकर, महेंद्र रत्नपारखे, बबन मगरे, पांडुरंग हिवाळे, भगवान धाबे, संजय सोनवणे, कैलास बनसोडे यांनी केले आहे.