जालना । प्रतिनिधी- टिपू सूलतान ब्रिगेडच्या वतिने जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्र राज्याचे उपमूख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या मौजे आन्वा येथील जामा मशिदचे मौलाना असलेले हाफिज सय्यद जाकेर यांच्यावर 7 ते 8 समाजकंटकानी मशिदीत प्रवेश करुन प्राणघातक हल्ला केला. त्यांना लाठी काठीने मारहाण केली. यात ते बेशूद्ध झाले. हे समाजकंटक केवळ यावरच थांबले नाही. तर त्यांनी धार्मिक भावना भडकवण्याच्या उद्देशाने मौलाना सय्यद जाकेर हे बेशूद्ध अवस्थेत असतांना त्यांच्या दाढीचे केस कापले मौलाना त्या ठिकाणी नमाज पठण करत होते. अज्ञात 7 ते 8 समाज कंटकानी केलेले कृत्य हे निंदणीय असून या घटनेचा टिपू सुलतान ब्रिगेडच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी टिपु सुलतान ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सय्यद करीम बिल्डर, कॉग्रेस जालना जिल्हा उपाध्यक्ष मूखतार लिडर, अॅड. सुभनी अयाज, मराठवाडा सचिव शेख शमशुद्दीन, अडॅ.उमर परसुवाले, मजहर सौदागर, शेख मनसूर, मजहर खान, ईलीयास मूसा, ईमरान बिल्डर, शेख मोईन, अफसर मिर्झा, अप्पा साहेब शंकर खरात, शेख मुजिब, ईब्राहीम, खान, शेख राजमहमद, शेख शाकेर, शेख सलीम आदींची उपस्थिती होती.
मंठा येथे पोलीस निरीक्षकांना निवेदन
मंठा – जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अन्वा गावीतील रहिवासी मौलाना हाफिज सय्यद जाकेर सय्यद खाजा यांना अज्ञात तीन व्यक्तिने गैर मार्गाने मशीदीत प्रवेश करुन धार शस्त्राने जिवघेणा हल्ला केला असुन त्यांना गंभीर जखमी केले.ज्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक व गंभीर असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी औरंगाबाद येथे त्वरित हलविल्यात आले.असुन त्यांचावर उपचार सुरु आहे. या प्राणघात हल्ला करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे मागणीचे निवेदन 29 मार्च बुधवार रोजी मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देशमुख यांना देण्यात आले.
या निवेदनात पुढील म्हटले की अनवा गावातील जामा मशीदचे मौलाना पवित्र कुराणचे पठण करतांना अज्ञात तीन व्यक्तिने त्यांच्यावर मशिदित येऊन धार ब्लेडने दाढि कापून त्यांच्या तोंडावर धारधार शस्त्राने जिवघेणा हल्ला करुन गंभीर जख्मी केले. या हल्लाखोर आतंकवादी लोकांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी समस्त मुस्लिम समाजच्या वतीने करण्यात आली. यावेळी निवेदनावर जमीर कुरेशी उपनगराध्यक्ष, बास मोहम्मद खान सभापती न.प, उबेद बागवान सभापती न.प, मुसा भाई कुरेशी माजी नगरसेवक, कय्यूम भाई कुरेशी माजी पंचायत समिती सदस्य, सिराज खान पठाण माजी उपनगराध्यक्ष न.प, मोईन भाई कुरेशी माजी नगरसेवक, कबीर भाई तांबोळी, इलियास भाई कुरेशी, हाजी शबाब भाई कुरेशी, मोसीन कुरेशी पत्रकार, सगीर पठाण, अफसर कुरेशी,मुस्तफा पठाण, इस्माईल राज यांचे स्वाक्षर्या होते.