जालना – शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार इयत्ता दहावी व बारावीमध्ये शिकत असलेल्या जिल्हा/विभाग/राज्य/राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होऊन प्राविण्य मिळविलेल्या खेळाडु विद्यार्थ्यांना क्रीडागुणांची सवलत देण्याची सुधारीत कार्यपध्दती निश्चित असुन त्यानुसार सन 2018-19 या शालेय वर्षापासून सुधारीत नियमावलीनुसारच क्रीडागुण सवलत देण्यात येणार आहे. अशी माहिती क्रीडा विभागाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
सुधारीत शासन निर्णयामधील परिशिष्ठानुसार एकविध खेळांच्या संघटनांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावयाच्या स्पर्धा विषयक कागदपत्रांची यादी नमुद केलेली आहे. सदर कागदपत्रांच्या आधारे एकविध खेळांच्या संघटनांची अधिकृतता ठरविण्यात येणार आहे. यापुर्वी जिल्ह्यातील एकविध खेळांच्या संघटनांना दि. 15 फेब्रुवारी 2023 रोजी पर्यंत कार्यालयात प्रस्ताव सादर करण्याविषयी सुचित करण्यात आले होते. परंतु अद्यापपर्यंत प्रस्ताव प्राप्त न झाल्यामुळे पुनश्च उपरोक्त शासन निर्णयातील परिशिष्ठ 5 मधील नमुद कागदपत्रांची यादी कार्यालयात दि. 5 एप्रिल 2023 पर्यंत सादर करावी. सदर कागदपत्रांच्या आधारे सन 2022-23 मधील क्रीडागुण सवलतीकरीता पात्र एकविध खेळांच्या संघटना निश्चित करण्यात येणार आहेत. त्यामुळे आवश्यक कागदपत्रामुळे क्रीडागुण सवलतीपासुन आपल्या एकविध खेळ संघटनाद्वारा आयोजित स्पर्धामधील सहभागी खेळाडु वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. असे जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी कळविले आहे. एकविध खेळ संघटनेने सादर करावयाचे कागदपत्रे पुढीलप्रमाणे ज्या स्तरावरील क्रीडा स्पर्धांचा क्रीडागुण सवलतीसाठी लाभ घ्यावयाचा आहे. त्या स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजनाबाबतचे परिपत्रक, ज्या स्तरावरील क्रीडा स्पर्धांचा क्रीडागुण सवलतीसाठी लाभ घ्यावयाचा आहे. त्या स्तरावरील क्रीडा स्पर्धांची भाग्यपत्रीका, ज्या स्तरावरील क्रीडा स्पर्धांचा क्रीडागुण सवलतीसाठी लाभ घ्यावयाचा आहे. त्या स्तरावरील क्रीडा स्पर्धात सहभागी झालेल्या खेळाडुंच्या नावांच्या विहित नमुन्यात (परिशिष्ठ 10) दोन प्रतीतील याद्या (प्रावीण्यासह) त्यावर राज्य संघटनेचे अध्यक्ष/सचिव यांची शाईची स्वाक्षरी व शिक्का आवश्यक आहे एकविध खेळाच्या राज्य संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांच्या शाईच्या नमुना स्वाक्षरीचे पत्र आवश्यक राहील. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.