जालना | प्रतिनिधी – भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवनिमित्त आचार्य ज्ञानसागर पाठशाळेच्यावतीने दि. 30 मार्च रोजी सकाळी 9 ते 11 आणि सायंकाळी 7.30 ते 8.30 या वेळेत सदर बाजार भागातील श्री श्रेयांशनाथ दिगंबर जैन मंदिरात सकल जैन समाजातील 0 ते 16 वर्ष वयोगटातील मुलांसाठी मोफत स्वर्ण प्राशन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
पुष्य नक्षत्रावर स्वर्ण प्राशन अतिशय लाभदायक आहे. सुवर्ण प्राशन हे 16 संस्कारांपैकी एक आहे. स्वर्ण प्राशनामुळे मुलांची स्मरणशक्ती, रोगप्रतिकार क्षमता वाढते. शरीरिक को मानसिक वृद्धी होते तसेच बुद्धी तल्लख बनून शरीर सुदृढ बनते. शिवाय हाडे मजबूत बनतात. शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता पूर्ण होते.
मुलांना स्वर्ण प्राशन देण्यासाठी आणताना अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर काही खाऊ घालू नये. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी वर्षा छाबडा 827533040, सरिता जैन 9822735591, रुही कासलीवाल 9881241110, प्रीती छाबडा 9422927815, संगीता लव्हाडे 942329303, पंकज झांझरी 942315618 यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करावी व मोठ्या संख्येने या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला मंडळाच्या अध्यक्षा शोभादेवी पाटणी, पाठशाळा अध्यक्ष सुषमा पाटणी यांनी केले आहे.