परतूर । प्रतिनिधी – लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयात मानव विकास अंतर्गत 88, मुलींना सायकल चे वाटप संस्थेचे सचिव कपिल आकात यांच्या हस्ते दि.25 रोजी करण्यात आले. या वेळी पोलीस निरक्षक शामसुंदर कौठाळे, माजी नगराध्यक्ष विनायक काळे प्रा. डॉ. भारत खंदारे, विलास पौळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील मुलींची पायपीट थांबावी व मुलींना वेळेवर शाळेत पोहचून ज्ञान ग्रहण करता यावे यासाठी केंद्रशासनाकडून इयत्ता आठवी च्या मुलींना मानव विकास अंतर्गत मोफत सायकलीचे वाटप करण्यात येते. या अनुषंगाने लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयातील 88,मुलींना सायकालीचे वाटप करण्यात आले. या वेळी अंकुश तेलगड, विजय राखे, अखिल काजी, सचिन खरात,इजरान कुरेशी, शबीर शैख, संदीप वाघ,भालेराव सर, इसरार खतीब, मुख्यध्यापक संजय जाधव, रामराव घुगे, श्याम कबाडी, कैलास खंदारे, रामप्रसाद नवल, अनिल काळे, सुरेश मसलकर, सचिन कांगणे, बळीराम नवल, श्रीमती व्रदा डक, श्रीमती स्वरा देशपांडे, सुभाष बरकूले, राजाभाऊ वडेकर आदी उपस्थित होते. कार्यकामाचे सूत्र संचालन योगेश बरिदे यांनी केले तर आभार अनिल काळे यांनी मानले.