टक्केवारी, खोटे गुन्हे आणि एमपी पवार मृत्यु प्रकरणाच्या तपासासाठी 6 एप्रिलला पोलिस अधिक्षक कार्यालयावर निदर्शने अ‍ॅड. रिमा काळे यांचा भ्रष्ट प्रशासना विरोधात एल्गार

43

जालना । प्रतिनिधी – जिल्हा पोलिस अधिक्षक आणि जिल्हा अधिकार्यांच्या अलबेलवृत्तीमुळे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असुन कंत्राटदार एमपी पवार यांचा मृत्यु प्रकरणी अधिकार्यांवर गुन्हे दाखल करावे. लदनिया प्रकरण तसेच कल्पना गौड यांचा जमिन घोटाळा प्रकरणी चिरीमीरी घेउन गुन्हे दाखल करणार्या अधिकार्यांवर कारवाही करावी यां मागण्यांसह अ‍ॅड. रिमा काळे यांनी एल्गार फुकारत दि. 6 एप्रिल रोजी जिल्हा पोलिस अ धिक्षक कार्यालयावर निदर्शने करणार असल्याचा इशारा दिला.
सामाजिक कार्यकर्त्या तथा प्रतिष्ठीत विधीज्ञ रिमा काळे यांनी आज पत्रकार परिषदेत हि घोषणा केली. सोमवारी आयोजीत पत्रकार परिषदेत त्यांनी विविध सामाजिक आणि ज्वलंत विषयांना हात घालत पोलिस व जिल्हा प्रशासनातील खाऊगीरी आणि हडेलहडप वृत्तीवर गंभीर आरोप केले. यात बनावट खरेदीखत आधारे क ल्पना गौड यांनी जरीना या महिलेच्या नावे असलेली मालमत्ता हडप केली. गौड यांचे खरेदी खत बनावट असल्याचे आणि त्यावरील हस्ताक्षर देखील बनावट असल्याचे हस्ताक्षर तज्ञाच्या अहवालात सांगीतले असे असताना दस्त नोंदणी कार्यालय आणि जिल्हा प्रशासनातील काहि अधिकार्यांच्या आर्थीक वाटाघाटीतुन पो लिसांना हाताशी धरुन मुळ मालकावरच गुन्हा नोदवण्यात आला. वास्तवात गौड यांच्यावर यापुर्वी अशाच एका प्रकरणाी उच्च न्यायालाच्या आदेशाने गुन्हा नोद आहे. गैड परिवारातील राधाकिसन, रानिवास, रोहित, तसेच इतर सदस्यांचे हे नित्याचे काम असल्याचे देखील अनेक प्रकरणावरुन दिसत असताना केवळ डोळ्यावर पैशाची झापड लावत फिर्यादीच आरोपी बनवला. या संदर्भातील सर्व पुरावे आपण जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिले असताना आणि सविस्तर कथन केल्यावर देखील ते मुग गिळुण गप्प आहेत यात नक्कीच काही तरी शंका येते असे देखील अ‍ॅड. काळे म्हणाल्या. पोलिस अधिक्षकांची कोणत्याच अधिकार्यावर पकड नसल्याने हे अधिकारी वसुली आणि मांडवली करीत फिरत आहेत. तर काही अधिकारी हे सामान्यांना कायद्याचा धाक दाखवत आणि गुन्हे दाखल क रण्याची धमकी देत एक ते तिन लाख रुपये खंडणीसदृश्य वसुल करत असल्याचे काही उदाहरण त्यांनी सांगीतले. सदरबाजार हद्दीतील एक दुकान रिकामी करुण देण्यासाठी पोलिस निरीक्षक, नगर पालिका मुुख्याधिक ारी संतोष खांडेकर यांनी सुपारी घेत मनिषा स्वप्नील लदनिया यांचे दुकाण रिकामे करीत नगिना वार्षनेय यांना ताबा दिला. यात न्यायालाचा कोणताही आदेश नसताना पोलिस आणि नगर पालिका इतक्या तत्परतेने काम क रत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. तर नुकतेच पालिकेचे कंत्राटदार एम पी पवार यांचा मृत्यु झाला यात एक आठवडा उलटला तरी त्यांच्या मृत्युची चौकशी झाली नाही. एम पि पवार यांच्या सारख्या कर्तबगार कं त्राटदाराचा मृत्यु हि जालना शहरासाठी लाजीरवाणी गोष्ट असुन पुर्वी 5-10 टक्के कमीशन घेणारे नगरपालिका, उपविभाागीय अधिकारी कार्यालय आता थेट 10-20 टक्क्यावर आले. आणि हे सर्व देता देता कंत्राटदार कोणते पाउल उचलेले याची कल्पना देखील न केलेली बरी असे त्या म्हणाल्या. काही कंत्राटदार आणि कार्यकर्त्यांनी आपल्याकडे या कमीशनवारीची अनेक गुपीते उघड केली असुन आपण लवकरच या संबंधीत वरिष्ठांकडे तक्रारी करणार असल्याचे त्या म्हणाल्या. या सर्व विषयाच्या अनुशंगाने आपण जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर एल्गार फुकाराला असुन दि. 6 एप्रिल गुरुवार रोजी निदर्शने करणार असल्याचा इशारा दिला.