अॅक्सीस बँकेच्या एटीएममशीन मध्ये सापडलेले 47 हजार पाचशे रुपये वाहतुक शाखेच्या पोलीसांनी बँक अधिकार्यांच्या मदतीने संबंधीत व्यक्तीस परत केले. प्रसंगी पैसे परत मिळाल्यानंतर गीलब्रेट अरोकरीदास यांनी सर्वांचे आभार मानले तर पोलीस कर्मचारी यांनी पैसे परत करून आत्मीय समाधान मिळाल्याची भावना व्यक्त केली.
पोलीसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे संबंधीताचे 47 हजार पाचशे रुपये नुकसान टळल्याने पोलीस कर्मचार्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
सविस्तर माहीती अशी की, दि 25 मार्च वार शनिवार रोजी ट्राफीक पोलीस कर्मचार्यांरी नंदकिशोर टेकाळे सोबत पोलीस हेडकॉस्टेबल भगवान बनसोडे हे झेब्रा टु मोबाईल कार ने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते आरपीटीसी गेट दरम्यान पेट्रोलींग करीत असताना त्यांना ऑक्सिस बॅक च्या एटीम मशीन मधुन वेगळाच आवाज येत असल्याचे समजले असता पोलीस कॅस्टेबल नंदकिशोर टेकाळे यांनी एटीम मशीन मध्ये जाऊन चेक केले असता एटीम च्या सीडीएम मशीन मध्ये 47500 रु बाहेर दिसले असता त्यांनी बनसोडे यांना बोलावून घेतले व सदरील घटनेची माहीती बँकेचे मॅनेजर आनंद आंधेकर यांना देऊन तात्काळ एटीम मशीन बंद करा अशा सुचना दिल्या. आणि सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबुलकर यांना पण माहीती दिली.
सदर पैशांची पडताळणी सी.सी टी.व्ही फुटेच बँकेचे अधीकारी यांनी चेक केले असता ते पैसे गीलब्रेट राज अरोकरीदास राहणार मराबादी, तामीळनाडु यांचे असल्याचे समजले त्यांच्याशी बॅकींग अधीकारी यांनी फोन व्दारे संपर्क करुण त्यानां सोमवार (दि 27) बँकेमध्ये बोलून असिस्टंट बॅक मॅनेजर रमेश पवार, पोलीस हेडकॉस्टेबल भगवान बनसोडे, नंदकिशोर टेकाळे, किशोर नाटकर यांच्या समक्ष संबंधीत व्यक्तीला पैसे परत केले व गीलब्रेट राज यांनी पोलीस कर्मचार्यांरी नंदकिशोर टेकाळे यांच्यासह सर्वांचे आभार मानले. अशा या इमानदार पोलीसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. पैसे परत करून आत्मीय समाधान मिळाल्याची भावना श्री टेकाळे यांनी यावेळी व्यक्त केली.