जालना । प्रतिनिधी – जालना येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा पत्रकार सौ. करुणा अच्युत मोरे यांना विजया लक्ष्मण काळे फौंडेशन व मराठा समन्वय परिषद महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ पुरस्कार अहमदनगर येथे दि. 24 मार्च 2023 रोजी प्रदान करण्यात आला.
सामाजिक क्षेत्रत केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांचा हा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सौ. करुणा अच्युत मोेरे यांनी उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून तसेच हिरकणी ग्रुपच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दोन मुलींना उच्च शिक्षणासाठी दत्तक घेतले असून महिलांच्या न्याय हक्कासाठी विविध कार्यक्रम राबविणे, पिडीत महिलांना न्याय मिळवून देणे, कोविड काळात गाव कोरोनामुक्त करणे, गोर गरीबांना अन्यधान्य वाटपक करणे आदी उपक्रमाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदरील पुरस्कार हा मराठा समन्वय परिषदेच्या प्रभारी अध्यक्षा तथा राज्य कार्याध्यक्ष सौ. अनिताताई काळे, मुंबई येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा एकल महिला पुनर्वसन समितीच्या प्रमुख विद्याताई गडाख, नोबल हॉस्पीटलच्या संचालिका डॉ. संगीता कांडेकर, सर्पमित्र प्रतिभाताई ठाकरे, सौ. अलका मुंदडा, मनिषा मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या पुरस्कराबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.