टेंभुर्णी । प्रतिनिधी – जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील फ्रेंड्स क्लब च्या वतीने 19 मार्च रोजी आयोजित भव्य तालुका स्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत टेंभुर्णी येथील बाजार पेठेत नवोदित बिल्डर सगीर निसार बागवान यांनी उत्कृष्ट बॉडी प्रदर्शन करीत अनेक बॉडी बिल्डरांना मागे टाकत बॉडी बिल्डिंग स्पर्धेत महत्वाचा मनला जाणारा ’जाफराबाद श्री’ हा सम्मान आपल्या नावे केला.’ जाफराबाद श्री’ स्पर्धेत समीर निसार बागवान यांना प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते जाफराबाद श्री चा बेल्ट ट्रॉफी आणि रोख 11,111रु देण्यात आले. सगीर बागवान यांना तालुका श्री चा बहुमान मिळताच त्यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोष साजरा केला.
या प्रसंगी माजी जि प सदस्य शालिकराम पाटील म्हस्के, राजू खोत, सरपंच प्रतिनिधी गौतम म्हस्के, माजी जि प सदस्य सर्जेराव शिंदे, भिकन पठाण, मसूद बागवान, शहज़ाद सय्यद, ,शोएब खान बिल्डर, जुबेर शेख़, शेख़ सैफ , इम्रान कुरेशी, अक्रम शेख, इरफान शेख, रफिक पठाण, शेख आसेफ, वसीम कुरेशी, सिकंदर कुरेशी, अस्लम शहा, फवाज कुरेशी, आमेर कुरेशी, अनस बागवान, सोहेल कुरेशी आदी शेकडो चाहत्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी पंच म्हणून अध्यक्ष बॉडी बिल्डिंग असोसिएशन जालन्याचे अलताफ कुरेशी, शकील बिल्डर जाफराबाद व जावेद बिल्डर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे आयोजन लब्बैक ग्रुप टेभुर्णी आणि फ्रेंड्स हेल्थ क्लब टेंभुर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फ्रेंड्स हेल्थ क्लब चे अध्यक्ष शोएब बागवान आणि मुन्ना पठाण आणि लब्बैक ग्रुप टेभुर्णी चे पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर सेवक तालेब खान यांनी व आभार मसूद बागवान यांनी मानले.