आदर्श खासगाव येथील शेख दाऊद बाबा यांचा उरूस..!

36

जाफराबाद । प्रतिनिधी – जाफराबाद तालुक्यातील आदर्श खासगाव येथील शेख दाऊद बाबा यांच्या उरुसाला उत्साहात प्रारंभ झाला आहे गेल्या शंभर वर्षाची या उरुसा ची परंपरा आहे संपूर्ण जाफराबाद तालुक्या त आदर्श खासगाव येथील शेख दाऊद बाबा यांचा उरूस प्रसिद्ध आहे हिंदू व मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक येथे येऊन दर्शन घेतात गुढीपाडव्यानंतर येणार्‍या पहिल्या सोमवारी म्हणजेच दिनांक 27/3/2023 सोमवारी रोजी शेख दाऊद बाबाचा उरूस भरतो सोमवारी रात्री नऊ वाजता ढोल ताशाच्या गजरात व आतिशबाजी करून श्रीकृष्ण नाथाच्या मंदिरापासून शेख दाऊद बाबाच्या संदलाच्या मिरवणुकीला प्रारंभ होतो गावातील मुख्य गल्ली मधून शेख दाऊद बाबाच्या दर्ग्यामध्ये संदलाची मिरवणूक आल्यावर सकाळी चार वाजता दर्गा शरीफ मध्ये शेख दाऊद बाबा यांच्या मिरवणुकीचे विसर्जन होते तसेच बाहेरगावी स्थानिक झालेले ग्रामस्थ आवर्जून या उरुसाला येतात. मंगळवारी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडतो बुधवारी सकाळी नमाजे फजर नंतर जिरायत फातेहा खाणी चा कार्यक्रम होतो. शेख दाऊद बाबा यांच्या उत्साहात सर्वांनी सहभागी व्हावे असे आव्हान मा.श्री. संतोष पाटील लोखंडे. अजिस शहा .नुरामत शहा . गफूर शहा .जाफर शहा .नकीम शहा. खलील शहा. बशीर शहा. रफिक शहा. आसिफ शहा.शेख. युसुफ शेख. दगडू. शेख शफी शेख मुसा. शेख. सांडू शेख कासम. शेख इस्माईल आतार. शेख मकसूद आतार. शेख अफसर. शेख रशीद. शेख जावेद. कबीर बाबा. शेख काशीम. संजय लोखंडे (पोलीस पाटील) समाधान लोखंडे. चेतन लोखंडे. सागर लोखंडे. लिंबाजी लोखंडे. शंकर हिवाळे .संतोष कोल्हे. संतोष यदमाल दिनकर कटक .मनोहर लोखंडे .शेख मोहम्मद शेख उमर .यांच्यासह इतरांनी कळविले आहे