केंद्र सरकारची दडपशाही खपवून घेणार नाही; पुढील टप्प्यात जेलभरो आंदोलन ः आ. गोरंट्याल

19

जालना । प्रतिनिधी – केंद्रातील भाजपा मोदी सरकारने सरकारी यंत्रणाचा दुरउपयोग करून दडपशाही धोरण आवलंबिल्याने लोकशाहीचा गळा घोटण्याचा कळस त्यांनी गाठलेला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून जनतेचा आवाज बंद करण्याचे षडयंत्र सुरू केले आहे. परंतू काँग्रेसजन हे कदापी सहन करणार नाही. पुढचा टप्पा जेलभरो आंदोलनाचा असेल असा इशारा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा आ. कैलास गोरंट्याल यांनी रविवारी सत्याग्रह आंदोलनाप्रसंगी दिला.
काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांची दडपशाही पध्दतीने केंद्र सरकारने खासदारकी रद्द करून लोकशाहीला काळीमा फासण्याचे अत्यंत दुर्दैवी काम केले आहे. त्याच्या विरोधात जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जालना येथे जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. त्यावेळी गोरंट्याल हे बोलत होते. पुढे बोलतांना असे म्हणाले की, देशामध्ये मोदी व भाजपाकडून विष पेरण्याचे काम होत असतांना सामाजिक समता धोक्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मनमानी कारभारामुळे लोकशाहीचे मूल्य लोप पावत आहे. ही देशासाठी चिंतेची बाब असल्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी सांगीतले.
जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख बोलतांना म्हणाले की, गांधी घराण्याने देशाच्या अखंडतेसाठी आणि एकात्मतासाठी आपल्या प्राणाची आहोती दिलेली आहे. देश त्यांच्या बलिदानाला कधिच विसरू शकणार नाही. खा. राहुल गांधी व काँग्रेस पक्ष देशातील लोकशाही टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून आपले सर्वस्व पणाला लावल्याशिवाय राहणार नाही. परंतू, कार्यकर्त्यांनी व जनतेने केंद्र सरकार व भाजपाचे असलेले मनसुबे उधळून लावण्यासाठी शांत बसू नये. खा. राहुल गांधी यांची दडपशाही पध्दतीने खासदारकी रद्द केली हे देशातील जनतेला अजिबात पटलेले नाही असे सांगुन श्री देशमुख यांनी केंद्र शासनाचा निषेध व्यक्त केला.
यावेळी आ. राजेश राठोड, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, प्रदेश सरचिटणीस प्रा. सत्संग मुंढे, ड. विनायक चिटणीस, प्रभाकर पवार आदींनी या सत्याग्रह आंदोलनाप्रसंगी केंद्रातील मोदी सरकारचा निषेध व्यक्त करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी शक्तीनिशी एकजुट होवून मोदी सरकारच्या दडपशाही विरूध्द लढण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन केले.
आंदोलनाविषयीचे सविस्तर प्रस्ताविक जालना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी केले. याप्रसंगी ड. राम कुर्‍हाडे, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, रामप्रसाद खरात, सुभाष मगरे, केदार कुलकर्णी, दिनकर घेवंदे, नंदाताई पवार, दिपक भुरेवाल, एकबाल कुरेशी, महाविर ढक्का, रमेश गौरक्षक, विनोद रत्नपारखे, शेख शमशोद्दीन, संजय भगत, वैभव उगले, शेख इब्राहिम, चंद्रकांत रत्नपारखे, राधाकिशन दाभाडे, सय्यद अजहर, शेख शकील, शेख रऊफ परसुवाले, नारायण वाढेकर, जावेद बेग, धर्मा खिल्लारे, बालकृष्ण कोताकोंडा, सिताराम अग्रवाल, किसनराव मोरे, कपील भुरेवाल, चंदाताई भांगडीया, मथुराबाई सोळुके, इंदुबाई मैद, अंजली परांडे, सिंधुबाई वाघ, शेख वसिम, बाबासाहेब सोनवने, परमेश्वर गोते, भागवत राऊत, शेख अनस, योगेश पाटील, अंजाभाऊ चव्हाण, फकीरा वाघ, भागवत घाटे, किशन जेठे, गणेश चांदोडे, सय्यद मुस्ताक, किशोर कदम, गुलाबखान पठाण, मनोहर उघडे, संतोष काबलिये, किशोर भुरेवाल, सय्यद रहीम तांबोळी, युवराज राठोड, शामराव लांडगे, शेख इरशाद, जावेद अली आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.