ओबीसींचा अपमान करणार्‍या राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपा करणार आंदोलन

14

जालना । प्रतिनिधी – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून टिप्पणी करून तेली समाजाचा आणि एकूणच ओबीसींचा अपमान केला आहे त्यांचा जाहीर निषेध. काँग्रेस नेते राहुल गांधी एका जाहीर सभेत मोदी आडनावावरून अपमानास्पद सवाल केला होता. त्यांनी तेली समाजाचा अपमान केला आहे ज्यांचा सर्वच ओबीसींनी निषेध केला पाहिजे यातून काँग्रेसची जातीयवादी वृत्ती दिसून येते असे लक्षात येते की राहुल गांधी अजूनही राजेशाही मानसिकतेतून बाहेर पडले नाहीत तथापि कोणी कितीही मोठा असला तरी देशाचा कायदा व संविधान सर्वात श्रेष्ठ आहे हे कालच्या सुरत न्यायालयाच्या निर्णयावरून दिसते आहे. न्यायालयाने व जनतेने माफी मागा व प्रकरण मिटवा असे सांगितल्यावर देखील माफी मागणार नाही असा आव आणून जो ओबीसींचा अपमान केला त्याबद्दल भारतीय जनता पार्टी जिल्हा जालना राहुल गांधी यांचा निषेध करते. भारतीय जनता पार्टी जालना दि.25 मार्च शनिवार रोजी सकाळी 10.30 वा, शहरातील स्वातंत्र्य वीर सावरकर चौक येथे राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध आंदोलन करणार आहे. तरी ही सर्व भाजपा पदाधिकारी, व जनतेने सदरील आंदोलनास पाठींबा देणेसाठी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा संघटन सरचिटणीस सिद्धीविनायक मुळे यांनी केले आहे.