गुढीपाडवा हिंदू नव वर्षानिमित्त भव्य मिरवणूक संपन्न

32

जालना | प्रतिनिधी – अनंत श्री विभुषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज आणि प. पु. कानिफनाथ महाराज यांच्या आशिर्वादाने गुढीपाडवा हिंदू नव वर्षानिमित्त बुधवार दि. 22 रोजी सकाळी 6 वाजता गांधी चमन येथून भव्य मिरवणूक सुरवात होऊन काशी विश्वेश्वर महादेव मंदिर छ. शिवाजीनगर जालना येथे संपन्न झाली.
या मिरवणूक यात्रेदरम्यान मराठवाडा पीठ देणगी प्रमुख सुरज वडे, जालना जिल्हा निरीक्षक विजय देशपांडे, जालना जिल्हाध्यक्ष नवनाथ पवार, जालना जिल्हा महिला अध्यक्ष शकुंतला घाडगे, कर्नल मधुकर पवार, सचिव अमोल निंबाळकर, देणगी प्रमुख श्याम पदमुळे, जालना तालुकाध्यक्ष योगेश बहुले आदींसह भक्त, शिष्य, साधक आणि हितचिंतकांची उपस्थिती होती.