मंठा शहराचे भूषण प्रभात फेरी

61
मंठा | प्रतिनिधी – सन 2014 ला सुरू केलेल्या श्री रामकृष्णहरी प्रभात फेरी मंडळातील गुलाबी साड्यातील महिला तर पांढऱ्या शुभ्र टोपी व ड्रेसमध्ये राममय झालेल्या सर्व भक्तांनी आज गुढीपाडव्याच्या प्रसंगी   रांगोळ्या व प्रजवलीत मंगल दीपक यांनी सजलेल्या रस्त्यावरून हरी नामाच्या गजराने संपूर्ण पारिसर भक्ती रसात तल्लीन केला सोबतीला गुरुकुलचे लेझीम   टाळ मृदंगा सोबत ची पावली हे सर्व विलोभनिय दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे होते पु राधाकृष्ण महाराजांच्या प्रेरणेने कासट यानी सुरु केलेली ही परंपरा अखंड नित्य नेमाने शहराच्या प्रमुख रस्त्यावरुन आजही कायम आहे प्रत्येक भारतीय सण उत्सव विशेष पद्धतीने साजरे करणे है या मंडळाचे वैशिष्ट्य आहे