अरणला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी शासनाकडे पाठपुरावा करणार- सहकारमंत्री अतुल सावे

12

जालना । प्रतिनिधी – संत सावता माळी महाराज यांचा वारसा जपणार्‍या सोलापुर जिल्ह्यातील अरण गावाला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी होत आहे. शासनाकडे याबबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिली.
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोडनिंबपासून चार किलोमीटरवर अरण आहे.
संत सावता महाराज यांना 45 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांनी कर्तव्यकर्माचा आणि नामसंकिर्तनाचा मार्ग अनुसरला. आपल्या हृदयात श्रीविठ्ठलाला जागा दिली, अशी आख्यायिका गावातल्या लहानथोरांना माहीत आहे. आता अरणचा समावेश तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमात झाला आहे. त्याद्वारे काही कामे झाली. मंदिरासमोर दोन मजली यात्री निवास झाले. श्रीविठ्ठलाची पालखी मुक्कामाला असत
सावता महाराज यांचे मूळ मंदिर ज्या ठिकाणी आहे त्याला लागूनच असलेली शेती ते करीत. संजीवन समाधीची मूर्ती मंदिरात आहे. मंदिराला लागूनच सावता महाराज आपल्या अभंगात लिहितात ती विहीर आहे. ज्या विहिरीवर त्यांनी मळा फुलविला, ती आज गावकर्‍यांची तहान भागवित आहे. सावता महाराज यांना मुलगी होती. तिच्या बाजूने असणारे त्यांचे वंशज रमेश वसेकर आणि दामोदर वसेकर मंदिरात पुजारी आहेत. श्री संत सावता माळी देवस्थान ट्रस्ट आहे. अनेक भाविक महाराष्ट्रातून व पर राज्यातून येथे येतात. या तिर्थक्षेत्रास अ दर्जा देण्याची मागणी अनेक सामाजिक संघटनांनी केली आहे. तसेच त्या तिर्थक्षेत्रास बस थांबा उभारण्यात यावा याबाबत सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडे मागणी केली आहे. या शिष्टमंडळात अभिमन्यु बापुसाहेब उबाळे यांच्यासह बाबुराव मामा सतकर, गणेश रामचंद्र चांभुळकर, प्रभु म. माळी, साखरचंद म. लोखंडे, सविकांत म. वसेकर, सावता म. वसेकर, महेश म. गावडे, रामेश्‍वर खांडेभराड, अनिल वायाळ, बाबासाहेब वानखेडे, दिपक वैद्य,शंकर सातपुते, ड. रामेश्‍वर खांडेभराड, सुरेश रत्नपारखे, सुरेश मानकस, कडुबा वाकीकर, संतोष जमधडे, महेंद्र रत्नपारखी, बाळासाहेब तिडके, निलेश वानखेडे, रघुनाथ मगर, सुरेश सद्गुरे, लक्ष्मण हारकळ, गंगुबाई वानखेडे, सचिन जैवाळ, रामदास गोरे, रमेश राऊत, रमेश गडकरी, मंगला खांडेभराड, देवकर, वैजीनाथ नांगरे, सावता माळी अनुयांचा समावेश होता.