स्वाभिमानीचे अर्धनग्न आंदोलन! कृषी अधिकारी सह पिक विमा कंपनीच्या कर्मचार्‍याला धरले धारेवर

21

टेंभुर्णी । प्रतिनिधी – जाफराबाद येथील कृषी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयुर बोर्डे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते व तालुक्यातील शेतकरी यांनी कृषी कार्यालयासमोर अवकाळी पावसामुळे व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई, पिक विमा,अतिवृषटचे अनुदान या मागण्यासाठी तब्बल पाच तास अर्धनग्न आंदोलन केले,मयुर बोर्डे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासन हादरले, पोलिसांची तारांबळ उडाली, तर पिक विमा कंपनीच्या कर्मचार्‍यांना घाम फुटला. कडाक्याच्या उन्हात आंदोलन सुरू होते, अखेर कृषी अधिकारी यांनी दहा दिवसांत पिक विमा जमा केला जाईल न केल्यास कंपनीवर गुन्हा दाखल करू तसेच गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे पंचनामे तात्काळ केले जाईल, अतुवृष्टीचे अनुदान देखील खात्यात जमा केले जाईल याची लेखी पत्र घेऊन हे आंदोलन मागे घेन्यात आले .
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुभाष भोपळे, उपाध्यक्ष गजानन भोपळे, हनुमंत मुरकुटे, नारायण भोपळे, अमोल कन्नर, विष्णु कदम, समाधान कन्नर, राजू गायकवाड, ज्ञानेश्वर सरोदे, समाधान भोपळे दिलीप बकाल, जिवन टेलर, रामेश्वर शेवत्रे ,समाधान खिल्लारे अरिफ शाहा, शंकर भोपळे, केशव भोपळे समाधान इंगळे, संतोष इंगळे, गणेश भोपळे, दादाराव भांबळे, आंनद भिसे, माधु भिसे, मंगेश म्हस्के, सुनील म्हस्के, राजु खेडेकर, भोपळे बाबा,नामदेव गायकवाड,अमोल गायकवाड,अंकुश गायकवाड सह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.
3