जालना । प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणी शहर व ग्रामीण मंडळाची बैठक आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या अध्यक्षतेखाली आज दि.20 मार्च रोजी ( खचAअ ) हॉल, राजुरी कोर्नर, जालना येथे संपन्न झाली.
यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ना.दानवे म्हणाले की, आगामी काळात होणार्या निवडणुका जिंकण्यासाठी बूथ सक्षमीकरणावर पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी भर द्यावा. सर्व बूथ प्रमुखांनी आपला व्हाट्सअपचा ग्रुपही तयार करावा. या माध्यमातून सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे सहज शक्य होईल. मेरा बूथ सबसे मजबूत या नुसार सर्वांनी मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधत त्यांना सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता प्रयत्न करावे. विविध योजनांची माहिती उपस्थित बूथ प्रमुखांना द्यावी. तसेच सर्व बूथ प्रमुखांनी पन्ना प्रमुखांची नियुक्ती करत मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करावा. आपण जगातील नंबर एकच्या राजकीय पार्टीचे सदस्य असून आपली ही पार्टी नुसती राजकीय पार्टी नसून एक परिवार आहे. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी सरल प फॉर्म मध्ये पूर्ण माहिती भरणे अनिवार्य आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपकडून बूथ सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे ना.दानवे यांनी सांगितले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे म्हणाले की, बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी आज पासून निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने पुर्ण शक्तीनिशी कामाला लागावे, देशात आणि राज्यात सर्व राजकीय पक्ष एका बाजूला आणि भारतीय जनता पार्टी एका बाजूला अशी स्थिती निर्माण झाली आहे, भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये हरवायचे आहे असा चंग विरोधकांनी बांधला आहे. परंतु आपले संघटन जर मजबूत असेल तर भाजपाला कोणीही हरवू शकत नाही. त्यामुळे भाजपा पदाधिकारी आणि बुथ प्रमुखांनी केंद्र व राज्य सरकारच्या जन कल्याणकारी योजना ग्रामीण व शहरी भागातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करून संघटन मजबूत करावे असे आवाहन बूथ सशक्तीकरण बैठकीत केले.
याप्रसंगी शहराध्यक्ष राजेश राऊत, प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर भांदरगे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक (आण्णा)पांगारकर, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सौ.संध्याताई देठे, अल्पसंख्याक सरचिटणीस अतिक खान, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव मामा खरात, सतीश जाधव, चंपालाल भगत, मराठवाडा युवती प्रमुख शर्मिष्ठा कुलकर्णी, प्रदेश वैद्यकीय सदस्य अमोल कारंजेकर, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष भागवत बापू बावणे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर, स्वीय सहायक गोवर्धन कोल्हे, तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे, शहर उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र भोसले, युवामोर्चा तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, जालना शहरातील व ग्रामीण मधील प्रदेश पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, जिल्हा पदाधिकारी, मंडळ, मोर्चा, प्रकोष्ठ चे पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, शक्ती केंद्र विस्तारक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.