जालना – जालना जिल्ह्यातील प्रधानमंत्री पिक विमा योजनेत ज्या शेतकर्यांनी रब्बी हंगाम 2023 या हंगामाकरिता पीकविमा भरला आहे, अशा शेतकर्यांनी एचडीएफसी एर्गो विमा कंपनी कार्यालयात संपर्क करून नुकसानीची तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
एचडीएफसी एर्गो कंपनीकडे पीक नुकसान तक्रार करण्याबाबत खालील पर्याय उपलब्ध आहेत. हीींिं://हशसळ.लेर्/ींल9घसटAएAAA या लिंकवर तक्रार नोंदवता येईल. तसेच मोबाईलद्वारे आपण नुकसान भरपाईची तक्रार करू शकता यासाठी टोल फ्री क्र. 18002660700, पिहू व्हाट्सएप 7304524888, मोबाईल ऐप्लिकेशन(क्रॉप इन्शुरन्स ऐप्लिकेशन)द्वारे खालील लिंक वर जाऊन पुर्व सूचना देऊ शकतात.
हीींिीं://श्रिरू.सेेसश्रश.लेा/ीीेींश/रििी/वशींरळश्री?ळव=ळप.षरीार्सीळवश.षरीाशीरिि.लशपीींरश्र किंवा आपल्या कृषी सहाय्यक यांना संपर्क करून आपल्या तालुका विमा प्रतिनिधी यांचेशी समन्वय करून 72 तासाच्या आत अवकाळी पाऊस गारपीट नुकसान कळवावी व तक्रार क्रमांक जपून ठेवावा.
पिक विमा तालुका प्रतिनिधी यांचे नाव मोबाईल क्रमांक पुढील प्रमाणे आहे. आरेफ शेख-जिल्हा प्रतिनिधी 9765471646, त्रंबकेश्वर मोरे -जालना तालुका 7972925979, विजय बोहाटे :-बदनापूर 8007351600, ज़फ़र शेख़:-बदनापुर:- 9021313586, मोरेश्वर गवळी :-अंबड- 7620102571, कृष्णा किवने:-अंबड:- 9404475040, सुदर्शन जाधव :- घनसावंगी- 8329145007, योगेश जाधव :- मंठा- 7774936085, हरिओम गोरे :-परतूर- 8308998331, रत्नदीप भालेराव :- जाफ्राबाद- 8483802619, वसीम शेख:- जाफ्राबाद:- 8766775222, अलीम शेख :- भोकरदन 8149134849. घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत शेतकर्यांनी कंपनीला कळवण अनिवार्य आहे, असे कृषी विभागाने कळविले आहे.