टेंभुर्णी | प्रतिनिधी – जाफ्राबाद तालुक्यातील वरूड बु सह भारज हनुमंतखेडा, देऊळझरी, कुंभारझरीसह परिसरात आवकाळी पाऊस व गारपीट तर टेंभुर्णी भागातील आंबेगाव अकोला देव, पापळ, तपोन,सह अनेक भागात जोरदार हवा मुळे अनेक शेतीमालाचे नुकसान झाले असून तोंडी आलेला घास हिराऊवून घेतला जातो की काय,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे सध्या स्थितीत काढणीला आलेले ज्वारी गहू हरबरा कांदा सह शेडनेट मधील पिके आडवी झालेली बघावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकर्यावर एका पाठोपाठ एक संकट आ करून उभे ठाकत आहे.अश्या परिस्थितीत शेतकर्याला धीर देण्याचे काम शासनाकडून अपेक्षित आहे.मात्र शासन कुठलीही मदत न करता नुसती बघ्याची भूमिका घेत आहे.आता तरी सरकारने तातडीचे पाऊल उचलून शेतकर्याला आर्थिक मदत करण्याची गरज आहे. या सर्व नुकसान ची पाहणी करने गरजेची असून तत्काळ शेतकरी यांच्या वर झालेल्या नुकसान ची भरपाई शासनाने करण्याची मागणी शेतकरी करत आहे.