परतूर । प्रतिनिधी – राज्यात व केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असेल तर धोरणात्मक निर्णय घेताना अडचणी येत नाहीत त्यामुळे समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी, चालना मिळते असे मत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले
ते मंठा व परतुर येथे नाफेड मार्फत चालवल्या जाणार्या हरभरा खरेदी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की केंद्र सरकारच्या माध्यमातून नाफेड खरेदी केंद्र सुरू करण्यात आली असून या माध्यमातून शेतकर्यांना आपल्या हरभरा या पिकाला हमीभाव मिळणार असून नाफेड च्या या योजनेचा शेतकर्यांनी निश्चितपणाने लाभ घेत आपल्या शेतात पिकवलेला हरभरा नाफेड खरेदी केंद्रामध्ये घालावा असे आवाहन उपस्थित शेतकर्यांना केले, पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यातील शेतकर्यांना या खरेदी केंद्रांच्या माध्यमातून निश्चितपणाने आपल्या हरभरा या भरड धान्याला निश्चित भाव मिळणार मिळणार आहे
केंद्र व राज्यातील सरकार हे खर्या अर्थाने शेतकर्यांचे सरकार असून, राज्यातील सरकारने घेतलेले निर्णय हे शेतकर्यांसाठी अतिशय हिताचे असल्याचे यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले शेतकरी सन्मान निधी मध्ये 6000 रुपयाची भर राज्य सरकारने टाकत वर्षाला केंद्राच्या बरोबरीने शेतकर्याला मदत केली असल्याचे सांगतानाच केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे शेतकरी सन्माननीय जिथे एकूण 12000 रुपये, शेतकर्यांना मिळणार आहेत, जलयुक्त शिवार चा दुसर्या टोप्याला लवकर सुरुवात होणार असून या माध्यमातून शेतीला समृद्धीकडे नेण्यासाठी सिंचनाचे क्षेत्र निश्चितपणाने वाढेल असा विश्वास यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला
यावेळी मंठा येथील कार्यक्रमाला अंकुश आबा बोराडे शिवाजीराव खंदारे गणेशराव खवणे,संदीप भैय्या गोरे भाजपा तालुका अध्यक्ष सतीश निर्वळ नागेशराव घारे नाथराव काकडे राजेश मोरे संजय छल्लाणी संजय भालेराव कैलास बापू बोराडे प्रल्हादराव बोराडे सचिन बोराडे वैजनाथ बोराडे प्रसाद बोराडे विठ्ठलराव काळे विलास घोडके उद्धवराव गोंडगे शेतकरी ज्ञानेश्वर माऊली कांगणे हरिभाऊ देशमुख बाबासाहेब बोराडे तर परतुर येथील कार्यक्रमाला भाजपा ता अध्यक्ष रमेश भापकर, अशोकराव बरकुले संजय छल्लाणी, प स सदस्य दिगंबर मुजमुले, शिवाजी पाईकराव युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संपत टकले, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रोहन आकात, सुरेश सोळंके संभाजीराव खवल, राजेश भापकर संजय भापकर वसंत भापकर, यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकर्यांची उपस्थिती होती